Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी

सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी

0
640

जामखेड न्युज——

सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी

 

सध्या समाजात तरूण मुले फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब यासारख्या समाजमाध्यामध्ये नको तेवढी गुंतलेली दिसते सोशल मीडिया लगाम नसलेल्या घोड्यासारखी आहे. नियंत्रण नसल्याने मोकळेपणाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे. त्यामुळे कौटुंबिक संस्कार मोडीत निघाले असून मुले बिघडत आहेत.

अभ्यासाच्या नावाखाली मुले अधिकाधिक वेळ मोबाइलवर रील आणि शॉर्ट्स पाहत आहेत. याचा सर्वांत घातक परिणाम म्हणजे मुलांचा त्यांच्या कुटुंबाशी असलेला संवाद सतत कमी होत चालला असल्याचे समोर आले आहे. मुलांच्या मनात गुन्हेगारी विचार वाढत आहेत. आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण असायला हवे असे ९३ टक्केपेक्षा अधिक लोकांनी म्हटले आहे.

लोक म्हणतात होय…या सर्व मुद्द्यांवर राजस्थानमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सहभागी ९७ टक्केपेक्षा अधिक लोकांनी सोशल मीडिया अश्लीलतेला प्रोत्साहन देत असल्याचे मान्य केले. याचा मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत आहे.

९३ टक्के जणांनी नको ती पोस्ट पाहिली सर्वेक्षणात सहभागी ९३ टक्के लोकांनी मान्य केले की समाजमाध्यमांवर त्यांनी कोणती ना कोणती आक्षेपार्ह पोस्ट पाहिली आहे. रील बनविण्याच्या स्पर्धेलाही ९४ टक्के जणांनी चुकीचे असल्याचे म्हटले.

कोरोना महामारीनंतर सोशल मीडियाचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. डिजिटल युगाचा आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाल्याने लोकांचा सोशल मीडियाकडे अधिक कल वाढला आणि त्यामुळे सामाजिक अंतर वाढू लागले. या अचानक झालेल्या बदलाचा आपल्या जीवनावर परिणाम झाला. सोशल मीडियाच्या अतिवापराने अनेक परस्पर भावनिक पैलू नष्ट केले आहेत आणि त्याच वेळी अनेक प्रकारच्या गंभीर मानसिक वेदनांना जन्म दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!