Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा व्याख्यान, महानाट्य, रक्तदान शिबीर,...

जामखेडमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा व्याख्यान, महानाट्य, रक्तदान शिबीर, पोवाडे, राज्यभिषेक व भव्य दिव्य अशी मिरवणूक

0
956

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा

व्याख्यान, महानाट्य, रक्तदान शिबीर, पोवाडे, राज्यभिषेक व भव्य दिव्य अशी मिरवणूक

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५१ वे वर्षे आहे. राष्ट्राचे अस्तित्व प्रस्थापित करून सबंध देशाला स्वातंत्र्याची नवी उर्मी आणि चैतन्यशक्ती प्रदान करण्याचे श्रेय निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाते. त्यांच्या राज्याभिषेकामुळे सबंध देशामध्ये ‘मुद्रा भद्राय राजते’ म्हणजे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले. जामखेड शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने व्याख्यान, महानाट्य, रक्तदान शिबीर, पोवाडे, राज्यभिषेक व भव्य दिव्य अशी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण

सोमवार दि. 17 जून रोजी सायंकाळी सात वाजता सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याने वसंत हंकारे सर यांचे बाप समजून घेताना या विषयावर क्रांतिकारी व्याख्यान होणार आहे.

मंगळवार दि. 18 रोजी राजा शिवछत्रपती महानाट्य, महाराज व मावळे यांच्या विजयाची शौर्य गाथा सायंकाळी सात वाजता.

बुधवार 19 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता शिवशाहीर हरिदास शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारातील पहिला पोवाडा लिहिणारे अज्ञानदास गोंधळी यांचे सतरावे वंशज यांचा भव्य असा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.

गुरूवार दि. 20 जून रोजी पहाटे पाच वाजता शिवरायांच्या मूर्तीचा राज्यभिषेक सोहळा होईल.
वरील सर्व कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती संभाजी महाराज मार्ग तहसील कार्यालयाच्या समोर जामखेड येथे असेल.

गुरूवार दि. 20 रोजी दुपारी 2.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे.

मिरवणुकीतील विशेष लक्ष्यवेधी पथके

श्री छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य मूर्ती, भव्य शिव मुर्ती, मराठा आरमार भव्य जहाज प्रतिकृती, महाराष्ट्रातील नावाजलेले ढोल पथक, लेझीम पथक, हलगी पथक, संभळ वाद्य पथक, शिवकालीन युद्ध कला असलेले चित्तथरारक मर्दानी खेळ लाठी काठी शस्त्र पथक, देव मामलेदार बँन्जो, पंजाबी वाद्य अशा प्रकारे विविधकार्यक्रमाचे शानदार सादरीकरण करण्यात येणार आहे. तरी सर्वानी या भव्य दिव्य अशा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!