जामखेड न्युज——
उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार
मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली असून त्यायावर ते ठाम आहेत. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. गेल्या चार दिवसांपासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.
आज मंगळवार रोजी आरोग्य पथक जरांगे यांच्या तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले आहे मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, नसता त्यांची प्रकृती आणखी खालावेल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारी यांनी दिली.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलीय. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. त्या अनुषंगाने आज आरोग्य पथकाने जरांगे यांची आरोग्य तपासणी केलीय. दरम्यान या तपासणीत जरांगे यांचा बीपी कमी झाल्याच समोर आलंय.
या सोबतच त्यांची शुगर पण कमी झाली असून त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारी यांनी दिलीय.आज त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी केली त्यांनंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
दरम्यान जरांगे यांनी उपचार घ्यावे नसता त्यांची प्रकृती आणखीन खलवेल असं डॉ. जयश्री भुसारी म्हणाल्यात. दरम्यान आम्ही त्यांना वारंवार उपचार घेण्यास सांगतोय मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांनी उपचार नाकारल्याची प्रतिक्रिया डॉ. जयश्री भुसारी यांनी दिलीय.
तर विधानसभेला गणित बिघडवणार
आम्हाला सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. ती झाली नाही तर विधानसभेला आम्ही फजिती करु असा इशारच जरांगेंनी दिलाय. मराठ्यांची मतं घ्यायची, त्यानंतर विरोधात बोलायचं असं चालणार नाही. भोळे मराठे मतं देतात, त्यांचा फायदा घेतला जातो. निवडून आले की मस्तीत यायचं हे कसं चालेल? तुम्ही आत्ता निवडून आला असाल तर विधानसभेला सगळ्यांना पाडणार. निवडून आल्यावर मराठ्यांना आरक्षण दिल्याची भाषा करणार असाल तर विधानसभेला बघून घेऊ. सरकारने अधिसूचना काढली आहे. अंमलबजावणी झाली नाही तर त्यांना कोट्यवधी मराठ्यांची नाराजी परवडणार नाही. मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका, असंही जरांगे म्हणाले आहेत. मराठ्यांचा रोष अंगावर घेतला तर विधानसभेला सगळं गणित अवघड होईल असंही मनोज जरांगेंनी मंगळवारी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.