जामखेड न्युज——
ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है, नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही – खासदार निलेश लंके
ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. पवार साहेबांनी चेंडू टाकला आणि समोरच्यांचा त्रिफळा उडाला. नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो, भले भले थकले. आता मुंबईवर झेंडा, तेही बहुमताने फडकणार आहे. विधानसभेवर पवार साहेबांचा झेंडा फडकणार आहे.
विधानसभेच्या आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे मी साहेबांना शब्द देतो, बाराचे बारा आणून दाखवतो”, असं अहमदनगरचे खासदार निलेश लंके म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलाय. यावेळी लंके बोलत होते. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.
मी जे बोलतो ते करून दाखवतो, मी विकेट काढतो
निलेश लंके म्हणाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी विकेट काढतो, मी खासदार झालो तेव्हा अनेकांना विचारलं खरंच खासदार झालो का ? पण साहेबांमुळे खासदार झालो. तुम्ही मला दिल्लीत नेऊन टाकले. जर संसदेत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर संसद बंद पाडतो, आमचं काम हटके आहे. बघा हे आचारसंहिता आपल्याला कळत नाही. एकदा दिल्लीला जाऊन येतो, अंदाज घेऊन येतो कसा काय ते? निम्मा अंदाज घेऊन आलोय. आपण काम करणारा माणूस आहे. एकच ध्यानात ठेवा, पवार इज पॉवर आहे, असंही निलेश लंके यांनी सांगितलं.
पवार साहेबांनी विश्रांती करावी – रोहित पवार
येणाऱ्या विधानसभेत साहेब त्यांना विश्राती देतील
रोहित पवार म्हणाले, पवार साहेब एक विचार आहे. सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे उभा राहिला. लोकसभेत आपले 8 खासदार निवडून आले. 2 उमेदवार जिद्दीने लढले. नकली चोरलेली राष्ट्रवादी त्यांचा स्ट्राईक रेट हा केवळ 25 टक्के आहे. विरोधक केवळ हिंदू मुस्लीम आणि जातीतजातीत तेढ निर्माण करत होते.
शरद पवार हे दुष्काळाबद्दल आणि कांद्याबद्दल बोलत होते. पलिकडे गेलेले बोलत होते की, पवार साहेबांनी विश्रांती करावी. येणाऱ्या विधानसभेत साहेब त्यांना विश्राती देतील, भाजपा हद्दपार होईल, असा विश्वास रोहित पवारांनी (Rohit Pawar) व्यक्त केला.