जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयातील M.Sc मधील तीन विद्यार्थिनींची कॅम्पस इंटरव्यू मध्ये कॅलिक्स फार्मा या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड.
जामखेड महाविद्यालयातील रासायनशास्त्र विभागातील M.Sc.II या वर्गातील तीन विद्यार्थिनींची प्लेसमेंट सेल अंतर्गत, कॅलिक्स फार्मा या बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये अंतिम वर्षाचा निकाल लागण्या अगोदर निवड झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाविद्यालयातील कु. पिंपळे मयुरी संजय,कु. राऊत पूजा रामचंद्र आणि कु. डूचे अश्विनी बाबासाहेब या तीन विद्यार्थिनींची कॅलिक्स फार्मा या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. डाॅ.एम.एल. डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. ए.बी फलके (कला शाखा प्रमुख) , प्रा. गाडेकर एस.एन (विज्ञान शाखा प्रमुख), प्रा.डॉ. गोलेकर एस. एम.(रसायनशास्त्र विभाग प्रमुख) प्रा. तरटे एन. बी. (प्लेसमेंट सेल समन्वयक), प्रा. पवार डी.के, प्रा.डॉ राळेभात एस.एस, प्रा.डॉ. मोहिते ए.डी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्यांनी शाबासकी देत, त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचे कौतुक केले. या विद्यार्थांनी यश संपादन करून, ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या साठी प्रेरणा निर्माण करण्याचे काम केले. या निवडीसाठी त्याना रसायनशास्त्र विभागातील प्रा. तरटे एन.बी (प्लेसमेंट सेल समन्वयक) तसेच रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष मा., श्री उध्दव (बापू ) देशमुख, उपाध्यक्ष मा, श्री.अरूण ( काका) चिंतामणी , संस्थेचे सचिव मा, श्री शशिकांत देशमुख, सहसचिव मा.श्री.दिलीप शेठ गुगळे, खजिनदार मा ,श्री राजेश मोरे , संचालक मा.श्री.अशोक शेठ शिंगवी, संचालक मा.श्री. सैफुल्ला खानसाहेब सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ एम.एल. डोंगरे , उपप्राचार्य डॉ नरके एस. वाय, तसेच महाविद्यालयीन विकास समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या निवडी बद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.