बत्ती गुलच्या समस्येने जामखेडकर हैराण जामखेड महावितरण म्हणजे असून अडचण नसून खोंळबा

0
523

जामखेड न्युज——

बत्ती गुलच्या समस्येने जामखेडकर हैराण, 
जामखेड महावितरण म्हणजे असून अडचण नसून खोंळबा

 

संपूर्ण उन्हाळा गेला त्यावेळी महावितरणने झोपा काढल्या आणी आता पाऊस सुरू झाल्यावर दुरूस्ती चे काम हाती घेतले आहे यामुळे दिवसभर तर कधी रात्रभर जामखेड मध्ये लाईट गायब असते. त्यातच काही भागात सतत प्युज जाणे हे प्रकार सतत घडत आहेत. बत्ती गुलच्या समस्येने जामखेडकर हैराण झाले आहेत. तरीही महावितरणला कसलाही घाम फुटत नाही.

सध्या कधी पाऊस तर कधी ऊन यामध्ये लाईट गेली तर बारा बारा तास दुरूस्ती होत नाही कोणीही फोन उचलत नाहीत. नागरिकांना कधी कधी रात्रभर उकाड्यात राहावे लागते. कधी दिवस दिवस लाईट नसते. यामुळे जामखेड कर हैराण झाले आहेत. अधिकारी कार्यालयात नसतात, फोन उचलत नाहीत. यामुळे जामखेड महावितरण कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोंळबा अशी स्थिती आहे.

अनेक दिवसांपासून जामखेड शहरासह
मिलिंदनगर, सदाफुले वस्ती, शिवाजीनगर भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा यामुळे इलेट्रिक उपकरणे नादुरुस्त होणे, सतत फ्युज उडणे यामुळे दोन महिन्यांपुर्वी
संतप्त झालेल्या मिलिंदनगर भागातील शेकडो महिला, मुले यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. पण कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हते सुमारे दोन तास महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. महावितरणचे अधिकारी मात्र नाँट रिचेबल होते.

जामखेड शहरासह अनेक दिवसांपासून मिलिंदनगर, सदाफुले वस्ती व शिवाजीनगर भागात वीचेचा सतत लपंडाव सुरू असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रंचड उकाडा सुरू आहे. यामुळे फँनशिवाय घरात बसू शकत नाहीत. पण लाईट सतत जाते येते. यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरण कडून अव्वाच्या सव्वा बील वसुल केले जाते पण सेवा मात्र मिळत नाही. फ्युज गेली तर लवकर टाकली जात नाही. लाईट जाणार आहे याची सूचना दिली जात नाही. तसेच अधिकारी फोन उचलत नाहीत यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.

 

चौकट

सध्या जामखेड साठी दोन आमदार व नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी लक्ष घालून अधिकारी यांना योग्य सूचना देण्यात याव्यात व जामखेड करांची समस्या सोडवावी अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here