जामखेड न्युज——
दहावीच्या परीक्षेत जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक व पाटोदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात 100 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविलेल्या साक्षी विनोद वराट व जामखेड तालुक्यात 96.60 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेल्या शिवरत्न कैलास वराट या दोघांनी साकतचा नावलौकिक वाढविला आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सुदाम वराट, अतुल दळवी, शिवरत्न कैलास वराट, साक्षी विनोद वराट, मुकुंद वराट, विनोद वराट, कुसुम वराट, अनुराधा दळवी, सुलभा लवुळ, कौशल्या वराट, ललिता पवळ (वराट) यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.

श्री साकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी शिवरत्न कैलास वराट दहावीच्या परीक्षेत जामखेड तालुक्यात प्रथम
श्री साकेश्वर विद्यालय साकत शाळेचा निकाल 98.18 लागला असून विद्यालयाचा विद्यार्थी वराट शिवरत्न कैलास 96.60 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक घोलप ऋतुजा नामदेव 89.80 तृतीय क्रमांक घोलप प्रतिक्षा दत्तात्रय 85.80 विशेष प्राविण्यासह 24, प्रथम श्रेणी 22, द्वितीय श्रेणी -07, पास श्रेणी 01

साक्षी विनोद वराट 100 टक्के गुण मिळवत पाटोदा तालुक्यात प्रथम
जामखेड तालुक्यातील साकत येथील मुळचे रहिवासी विनोद अशोक वराट हे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे नोकरी निमित्त स्थायिक आहेत. साक्षी ही येथील भामेश्वर विद्यालयात होती. दहावीच्या परीक्षेत साक्षीने 100 टक्के गुण मिळवत पाटोदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शिवरत्न कैलास वराट व साक्षी विनोद वराट यांनी जामखेड व पाटोदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे याबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला.






