राज्यस्तरीय सबज्युनिअर मल्लखांब स्पर्धेत कृष्णा जगदाळे महाराष्ट्रात ६ वा जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा

0
320

जामखेड न्युज——

राज्यस्तरीय सबज्युनिअर मल्लखांब स्पर्धेत कृष्णा जगदाळे महाराष्ट्रात ६ वा

जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा

 

जामखेड येथील श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक श्री बबलु (वस्ताद) टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा जगदाळे याने कठोर परिश्रम घेत राज्यस्तरीय सबज्युनिअर मल्लखांब स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावला आहे याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आयोजित ४० वी मिनी व सबज्युनिअर राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क, अहदनगर येथे दिनांक २५ मे २०२४ व २६ मे २०२४ रोजी पार पडली.

या स्पर्धेत मुंबई शहर,मुंबई उपनगर,सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, चंद्रपूर, नागपूर, जळगाव, परभणी, अमरावती, ठाणे, सोलापूर, या जिल्ह्यातील वयोवर्ष १२ व १४ वर्षाखालील २०० हुन अधिक मुले व मुलींनी सहभाग घेतला होता.

या अटीतटीच्या सामन्यात वयोवर्ष १४ वर्षाखालील मुलांच्या दोरीवरील मल्लखांब या प्रकारात अहमदनगर जिल्ह्यातील, जामखेड येथील श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेचा चि.कृष्णा सचिन जगदाळे याने महाराष्ट्रात ६ वा क्रमांक पटकावला.

कृष्णाने गेल्या वर्षभरापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, खडतर प्रवास करीत सराव करत हा विजय संपादीत केला. त्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक श्री बबलु(वस्ताद) टेकाळे, प्रशिक्षक गणेशदादा माने, प्रशिक्षक रोनित खुपसे, व संस्थेतील सर्वच सहकारी, तसेच नगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सर्व अधिकारी पदाधिकारी आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here