Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय वशु पंच परीक्षेसाठी निवड

जामखेडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय वशु पंच परीक्षेसाठी निवड

0
887

जामखेड न्युज——

जामखेडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय वशु पंच परीक्षेसाठी निवड

 

ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने हॉटेल सोरीना, पुणे येथे दिनांक 30 मे ते 3 जून पर्यंत राज्य वुशु पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या राज्य वुशु पंच परीक्षा व प्रशिक्षक शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा वुशु संघटनेच्या वतीने आयडियल स्पोर्ट अकॅडमी जामखेडचे खेळाडू रोहित थोरात, विशाल धोत्रे, श्रेयस वराट व विशाल वाघमोडे यांची निवड झाली आहे.

हे सर्व खेळाडू शालेय राज्य वुशु स्पर्धेमधील पदक विजेते आहेत या सर्व खेळाडूंना अहमदनगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व राष्ट्रीय पंच लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या सर्व खेळाडूंचे अहमदनगर जिल्ह्यामधून कौतुक होत आहे.

सहा महिन्यांपुर्वी या खेळाडूंनी पुणे विभागीय शालेय वुशु स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेसाठी हे खेळाडू खेळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!