जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी चार आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
2242

जामखेड न्युज——

जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी चार आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 

आरोपी व त्यांच्या पत्नीचे भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादीचे वडील गेले असता यातील आरोपींनी तु आमच्या घरगुती गोष्टीत नेहमीच लक्ष घालतोस, आज तुझा काटाच काढतो असे म्हणत फिर्यादीचे वडील यांना डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण करत गंभीर जखमी केले.

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना जामखेड पोलीसांनी अटक केली आहे.

विशाल जिंत्तुर भोसले, अतुल उर्फ धिरज जिंत्तुर भोसले, लखन जिंत्तुर भोसले, वैभव जिंत्तुर भोसले रा. सर्व खांडवी ता जामखेड असे चार आरोपींचे नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादीचे वडील शरद गुलबशा भोसले हे आरोपी धिरज उर्फ अतुल जिंत्तुर भोसले व त्याची पत्नी तेजल यांच्यात चाललेली भांडणे सोडविण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी विशाल जिंत्तुर भोसले यांने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली तर अतुल उर्फ धिरज जिंत्तुर भोसले, लखन जिंत्तुर भोसले, वैभव जिंत्तुर भोसले या तिघांनी जखमीस तु आमच्या घरगुती गोष्टीत नेहमीच लक्ष का घालतोस, आज तुझा कायमचा काटा काढून जीवे मारून टाकू असे म्हणत फिर्यादीचे वडील शरद भोसले यांना ठार मारण्याच्या उद्देशाने काठीने मारहाण करत गंभीर जखमी केले.

या प्रकरणी नयना इंत्तू काळे रा. खांडवी यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जामखेड पोलीसांनी अवघ्या चोविस तासात अतुल उर्फ धिरज जिंत्तुर भोसले, लखन जिंत्तुर भोसले, वैभव जिंत्तुर भोसले या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी फरार आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गौतम तायडे हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here