१ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडे कडे सापडले घबाड

0
2413

जामखेड न्युज——

१ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडे कडे सापडले घबाड

 

बीड शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेत १०० कोटींचा घोटाळा गेल्यावर्षी समोर आला. या पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्षा अनिता शिंदे, व्यवस्थापक सुनीता वांढरे व इतरांवर एकूण ४ गुन्हे नोंद झाले. अनिता शिंदे अटकेत असून इतर फरारी आहेत. बबन शिंदे याने दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी ६० लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुरू होती.

या गुन्ह्यात त्यांना आरोपी करण्याची भीती दाखवून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी हरिभाऊ खाडे याने दोघांकडे प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ३० लाखांत तडतोड झाली होती. यातील ५ लाख रुपयांचा पहिला हफ्ता गुरुवारी (१६ मे) कापड व्यापारी कुशाल प्रवीण जैन याने खाडे यांच्यावतीने घेतला होता. याप्रकरणी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक फौजदार आणि खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत.

बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता खाडे यांच्या बीड मधील किरायच्य घरात रोख एक कोटी आठ लाख रुपये, १० तोले सोने, साडे पाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे सापडले आहेत. पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांनी ही माहिती दिली.

हरिभाऊ खाडे पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर असे निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी १ कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.

जाधवरच्या घरात २५ तोळे सोनेसहायक फौजदार जाधवर यांच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे. तसेच रोख १८ हजार एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व जप्त केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here