जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयाचा खेळाडू ओंकार समुद्र ची पुणे विद्यापीठ बॉल बॅडमिंटन संघात निवड

जामखेड महाविद्यालयाचा खेळाडूं ओंकार (कुणाल ) रामदास समुद्र यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॉल बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ओंकार समुद्र हा खेळाडूं 31 मे ते 3 जून या कालावधीत जेप्पीयार विद्यापीठ चेन्नई येथे आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (All India Inter University ) स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ओंकार यांस प्रा. डॉ. आण्णा मोहिते याचे मार्गदर्शन लाभले.

ओंकार च्या निवडीबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक अशोक शिंगवी, सैफुल्ला खान, प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, प्रा. अविनाश फलके, प्रा. गाडेकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्रपरिवार यांनी ओंकार चे अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा डिसेंबर महिन्यात जामखेड महाविद्यालयात जल्लोषात पार पडल्या होत्या यातही जामखेड महाविद्यालय जामखेड अव्वल स्थानी राहिले होते. तसेच राष्ट्रीय सँम्बो स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती.

ओंकार (कुणाल ) रामदास समुद्र यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॉल बॅडमिंटन संघात निवड झाल्यामुळे जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.






