जामखेड न्युज———-
बाफना पॉलिमर्स इंडिया कंपनीची उत्तुंग भरारी
बाफना परिवाराच्या योगदानामुळे जामखेडचे नाव जागतिक पातळीवर

बाफना उद्योग समूहातर्फे आतापर्यंत बाफना पॉलिमर इंडिया, जलमोती पाणी, बाफना पेट्रोलियम या उद्योगाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहेच याचबरोबर बाफना उद्योग समूहातर्फे Oil pearl शुद्ध खाद्यतेल नवीन व्यवसायामध्येही आपला नावलौकिक मिळवला आहे. पॉलिमर्स इंडिया या कंपनीने चायना देशातील न्यू वांकाई कंपनीचे ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर झाल्याने जामखेडच्या उद्योगाची ख्याती आता जगभरात पोहचवली आहे. जामखेडचे नाव उद्योग क्षेत्रात बाफना परिवाराने जागतिक पातळीवर नेले आहे जामखेड करांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मधील बाफना पॉलिमर्स इंडिया या कंपनीची उत्तुंग भरारी चायना देशातील न्यू वांकाई कंपनी चे झाले ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर इन इंडिया आता संपूर्ण भारतामध्ये मध्ये प्री -फॉर्म बनवणाऱ्या कंपन्यांना कच्चामालाचा पुरवठा सेवा देण्यासाठी सज्ज झालो आहे असे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश बाफना यांनी सांगितले.

कंपनीने आता जगभरातील कंपन्यांशी संपर्क साधून भारतीय बाजारपेठेमध्ये कमीत कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त मालाचा पुरवठा करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे अशी माहिती बाफना इंडस्ट्रीज प्लांट हेड कृष्णराव चव्हाण सर, प्रोडक्शन हेड परशुराम भांगे, सेल्स हेड अशोक कुमटकर, यश भंडारी व इतर सर्व उपस्थित सहकारी यांनी दिली.

उद्योग क्षेत्रातील आपल्या दर्जा व गुणवत्तेसाठी बाफना उद्योग समुहास २०२२ मध्ये पुणे याठिकाणी राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता पॉलिमर्स इंडिया या कंपनीची उत्तुंग भरारी घेतली आहे. चायना देशातील न्यू वांकाई कंपनीचे ते ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर झाले आहेत. इन इंडिया आता संपूर्ण भारतामध्ये मध्ये प्री -फॉर्म बनवणाऱ्या कंपन्यांना कच्चामालाचा पुरवठा सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

उद्योग क्षेत्रातील बाफना परिवाराच्या योगदानामुळे जामखेडचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे. निश्चितच जामखेड करांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.





