जामखेड न्युज——
खरी मानवतेची पुजा संतांनीच केली – प्रकाश महाराज बोधले
गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने साकतमधील सप्ताहाची सांगता
खरी माणवतेची पुजा संतांनीच केली आहे. कसलाही भेदभाव न करता सर्व धर्म समभाव मानला साकतची खरी संपत्ती अखंड विनावादन आहे. प्रत्येकाने विनावादन करून आपली संपत्ती टिकवून ठेवावी असे गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज काल्याचे किर्तन झाले.
यावेळी त्यांनी कीर्तनासाठी पुढील अभंग निवडला होता.
याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥
आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥
हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥
तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥
तुम्ह सवंगड्यांना यायच असेल तर माझ्या मगोमाग या तुम्ही ‘पुरे’ म्हणोपर्यंत मी तुम्हाला पोटभर जेवण देतो मात्र मझ्याबरोबर हळूहळू चला, एकमेकांशी बोलू नका तुकाराम महाराज म्हणतात, संसाररूपी कच्या कन्या टाकून दया. त्यांनी पोट भरू नका
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, सरपंच हनुमंत पाटील, प्रमोद मुरूमकर, हनुमंत वराट, दादासाहेब दाताळ, ईश्वर मुरूमकर,
सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवतकथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, भागवतकथा हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम होते.
जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. ३ पासून सुरू झाला होता. आज बुधवार दि. १० रोजी काल्याच्या किर्तनाने सांगता झाली यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांनी हजेरी लावली होती.
सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे होते.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप गणेश महाराज काळवणे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, ३ ते ५.३० भागवतकथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन नंतर गाव जेवन त्यानंतर हरिजागर होत होता.
सप्ताहाचे संयोजक हभप भिमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर होते
गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर होते.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे हे होते.