Thursday, April 2, 2026
Home ताज्या बातम्या साकतमधील सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशी हभप बापू महाराज दातार यांची किर्तनसेवा संपन्न

साकतमधील सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशी हभप बापू महाराज दातार यांची किर्तनसेवा संपन्न

0
265

जामखेड न्युज——

साकतमधील सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशी हभप बापू महाराज दातार यांची किर्तनसेवा संपन्न

 

प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास दुसऱ्या दिवशी गुरूवार दि. 4 रोजी हभप हभप बापू महाराज दातार कोठुरेकर, ता. निफाड, नाशिक यांचे किर्तन झाले गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी कीर्तनासाठी पुढील अभंग घेतला होता.

निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥


अर्थ
या विठ्ठलच्या ठिकाणी निष्ठावंत भक्ती भाव असणे हाच भक्तांचा स्वधर्म आहे हे वर्म भक्तांनी कधीही चुकवू देवू नये.विठ्ठलच्या ठिकाणी निष्काम व निश्चल विश्वास ठेवावा व इतरांचा वास व वाटकधीच पाहू नये.तुकाराम महाराज म्हणतात असा कोणता भक्त आहे की,देवाने त्याची उपेक्षा केली आहे?असे मी कधी ऐकले देखील नाही.

सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवतकथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, भागवतकथा हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.


जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. ३ पासून सुरू झाला आहे. व बुधवार दि. १० रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल.
दुसऱ्या दिवशी गुरूवार दि. ४ रोजी हभप बापू महाराज दातार कोठुरेकर, ता. निफाड, नाशिक यांचे किर्तन झाले

आज शुक्रवार दि. ५ रोजी हभप सोमनाथ महाराज घोगरे माळशिरस
शनिवार दि. ६ रोजी हभप सौ. सोनालीताई महाराज मोरे (कापसे) आळंदी देवाची
रविवार दि. ७ रोजी सौ. वर्षाताई महाराज काळे बीड
सोमवार दि. ८ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पवने आळंदी
मंगळवार दि. ९ रोजी गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ
बुधवार दि. १० रोजी हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.

सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप गणेश महाराज काळवणे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, ३ ते ५.३० भागवतकथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन नंतर गाव जेवन त्यानंतर हरिजागर होईल.

तसेच बुधवार दि. १० रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संयोजक हभप भिमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर असतील.

गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!