पाडळी शिवारात गळफास घेऊन एकाची आत्महत्या, दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल

0
1969

जामखेड न्युज——–

पाडळी शिवारात गळफास घेऊन एकाची आत्महत्या, दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल

 

बसमध्ये बसवून दिल्यानंतर हरवलेल्या भावास सापडुन दे नाहीतर तुझ्याकडे पाहून घेतो असे म्हणुन धमकावल्याने या त्रासाला कंटाळून एकाने पाडळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन महिलांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वर शंकर साळवे, वय ४० वर्षे रा. राजनगर मुकुंदवाडी ता. जिल्हा. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महीला रेखा सुनील खिल्लारे व सारीका प्रदिप सरदार दोन्ही.रा ता. जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा दोन महीला विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या घटनेतील हरवलेली व्यक्ती व गळफास घेऊन आत्महत्या केलेली व्यक्ती हे कुसडगाव परीसरात रंगकाम करण्यासाठी आले होते. यातील आरोपी महीलेचा भाऊ राजरतन वसंतराव अवसरमोल हा काही दिवसांपासून बेपत्ता झाला आहे.

यातिल मयत प्रेमचंद उर्फ प्रेम शंकर साळवे वय ४५ वर्षे याने आरोपीच्या भावास छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी एस टी बस मध्ये बसवुन दिले होते. मात्र तेंव्हा पासून त्यांचा भाऊ राजरतन अवसरमोल हा बेपत्ता झाला होता.त्यामुळे आरोपी महीला या मयत याच्यावर तु आमचा भाऊ सापडुन दे नाहीतर आम्ही तुझ्याकडे पाहुन घेऊ आसे म्हणुन दम दिला. यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून आखेर मयत प्रेमचंद उर्फ प्रेम शंकर साळवे वय ४५ वर्षे याने दि २४ मार्च रोजी दुपारी जामखेड तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी वरील आरोपी हे मयत प्रेमचंद उर्फ प्रेम साळवे यांच्या आत्महतेस कारणीभूत आसल्याने संबंधित धमकी देणार्‍या दोन्ही महीलान विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संतोष पगारे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here