जामखेड न्युज—–
विहिरीमंजुरी चौकशी वरून आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर
कोट्यवधी रुपयांचा मलिदा हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी आवश्यक
जामखेड तालुक्याची दुष्काळी ओळख मिटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर विहिरी मंजुरी मिळाली यात अधिकारी वर्गानेही हात धुवून घेतला कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाली. गोरगरीब शेतकऱ्यांकडून वीस ते तीस हजार रुपये मंजुरी साठी लागतात म्हणून कोट्यवधी रुपये दलालातर्फे अधिकारी वर्गाच्या खिशात गेले याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या मात्र चौकशी कोणी लावली याबाबत दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वाँर जोरदार सुरू आहे.
काहिनी जुन्या विहिरी दाखवून अधिकारी वर्गाला मँनेज करून बील काढले पण ज्यांनी खरोखर काम केले तरीही वर्षे वर्षे रोजगार हमी मस्टर दाखवले जात नाही. बील काढले जात नाही. शेतकरी परेशान होतात. अधिकारी वर्गाला मँनेज केले तर लवकर बील निघते. कोणाचा प्रस्ताव कधी दाखल किती बील मिळाले किती राहिले का राहिले मागून मंजुरी मिळालेल्या विहिरींचे बीले कशी निघाली या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे.
शेतीला बारमाही पाणी मिळावे यासाठी सरकारने विहीरीसाठी चार लाख रुपये अनुदान देते.
कर्जत जामखेड तालुका दुष्काळी असल्याने चार ते पाच हजार शेतकऱ्यांनी विहीरीचे प्रस्ताव दाखल केले. त्या प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली. पण होळीच्या दिवशी आ. प्रा. राम शिंदे व आ. रोहीत पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विहीरींची चौकशी कोणी लावली यावर सोशल वॉर सुरू आहे.
भाजपवाले आ. रोहीत पवार यांच्यावर आरोप करतात तर राष्ट्रवादीवाले आ. राम शिंदे वर आरोप करतात या आरोप, प्रत्यारोपामुळे मंजूर विहीरी धारक शेतकरी मात्र संकटात आले आहे. विहीरी मंजूर करून घेण्यासाठी एका शेतकऱ्याला जवळपास ३५ ते ४० हजार खर्च झाला आहे. तालुक्यातील वाघा येथे ग्रामसेवक व एका प्राध्यापकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजाराची लाच घेताना अटक केली होती. त्यामुळे विहीर मंजूर गावपातळीवरील खर्च वेगळा व पंचायत समितीत आल्यावर खर्च किती होतो याबाबत लाभार्थी शेतकऱ्यांनाच माहिती आहे पण ते बाहेर ब्र शब्द काढीत नाही. कारण साखळी कशी आहे हे त्यांना माहित आहे.
कर्जत जामखेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर विहीर मंजूर झाल्या आहेत. गावोगावी असलेली राजकीय स्पर्धा, कोणी कशी विहीर मिळवली, जुन्या विहीरी दाखवून बिल कसे काढण्यात आले याबाबत सर्रास चर्चा पंचायत समितीच्या आवारात व आसपास चहाच्या ठिकाणी होत आहेत. तसेच अनेक जण हातात फायली घेऊन पंचायत समितीत फिरत आहेत. त्यामुळे विहीरीच्या प्रस्तावाला ग्रहण लागले आहे. या विहीर प्रस्तावाची चौकशी आता लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात आ. राम शिंदे यांनीच चौकशी लावली. आ. रोहीत पवार यांनी ग्रामीण भागात गावोगाव विहीरींचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील ३ हजारपेक्षा जास्त लोकांच्या विहीरींचे प्रस्ताव मंजूर करुन घेतले.
तर आ. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेड तालुक्यात आ. राम शिंदे यांनी साडेचार हजार विहीर मंजूर करून आणल्या त्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ झाला. या आरोप प्रत्यारोपामुळे मात्र जनतेची करमणूक होत आहे तर लाभार्थी विहीर धारक मात्र प्रस्ताव मंजूर करेपर्यंत जो ४० हजार रुपये खर्च झाला त्यामुळे ते त्रस्त आहेत. दुष्काळात झालेला खर्च कसा वसूल करायचा यावर ते चिंतेत आहेत.