जामखेड न्युज——–
ज्युनियर आयएएस परिक्षेत जामखेडची श्रेयसी युवराज भोसले राज्यात पहिली
ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेजचे प्रा. युवराज भोसले व चुंबळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका उज्वला वारे मॅडम यांची कन्या श्रेयसी हिने ज्युनियर आयएएस परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रेयसी भोसले हि इयत्ता सहावीत वसुंधरा आष्टी येथील शाळेत आहे. तिने ज्युनियर आयएएस परिक्षेत 300 पैकी 276 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रेयसी हि लहानपणापासून हुशार मुलगी म्हणून तिची ओळख आहे. तिने आतापर्यंत प्रत्येक परिक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सैनिकी स्कूल परिक्षेत तिने 255 गुण मिळवून क्रमांक पटकावला होता तसेच नवोदय परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेतही ती उतीर्ण झाली होती.
संस्कार प्रकाशन लातूर तर्फे आयएएस परिक्षा इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण राज्यात घेतली जाते. यात भाषा, बुद्धीमत्ता, गणित विषय असतात यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी विशेष बक्षिसे ठेवली जातात. श्रेयसी भोसले हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. या परिक्षेत यशस्वी विद्यार्थी भविष्यात आयएएस आयपीएस परिक्षेत निश्चितच यशस्वी होतात.
श्रेयसी युवराज भोसले हिची चुलत बहीण उपजिल्हाधिकारी आहे. वडील प्राध्यापक आई शिक्षिका आहेत यामुळे तिला घरातून चांगले वातावरण आहे. तिच्या यशाबद्दल आजोबा दत्तात्रय वारे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष मनोज धस, शाळेचे प्राचार्य व मार्गदर्शन करणारे शिक्षक, दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उध्दव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव मोरेश्वर देशमुख, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेजचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य, प्राध्यापक तसेच जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत सह सर्व सभासद मित्रमंडळी, सर्व शिक्षक,शिक्षिका,नातेवाईक, हितचिंतक यांनी श्रेयसीचे व आई वडिलांचे अभिनंदन केले आहे.
आज ज्युनियर आयएएस परिक्षेचा निकाल जाहीर झाला यात श्रेयसी युवराज भोसले हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला यामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.