जामखेडमध्ये महिला करणार अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा रक्तदाब शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मान्यवरांचा सन्मान, भव्य दिव्य मिरवणूक

0
670

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये महिला करणार अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा

रक्तदाब शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मान्यवरांचा सन्मान, भव्य दिव्य मिरवणूक

 

जगदंबा प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच जामखेड तसेच शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी काशिद या गेल्या बारा वर्षापासून सर्व महिलांना घेऊन अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करतात. यात रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच परिसरातील विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, महिलांची भव्य दिव्य मिरवणूक अशा पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील नवे तर राज्यातील हा अनोख्या पद्धतीने महिला आयोजित कार्यक्रम आहे.

जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये महिला अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद आहेत तर जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या वतीने हे बारावे वर्ष आहे तर महिला आयोजित शिवजयंतीचे हे तिसरे वर्ष आहे. दि. २७ रोजी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जामखेड शहरातील लक्ष्म चौक (संविधान स्तंभ) येथे शिवजन्मोत्सव सोहळा माहिला समिती आयोजित शिवजयंती निमित्त मा.संजय (काका) काशिद मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

२७ मार्च रोजी सायंकाळी ७.०० वा. तालुकास्तरीय सांस्कृतिक नाट्यछटा स्पर्धा २८ मार्च २०२४ पालखी सोहळा व भव्य महिला रँली आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज पेठ, लक्ष्मीआई चौक (संविधान चौक) सायंकाळी ७.०० शिवरायांची महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा निर्माण करणाऱ्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सन्मान सोहळा तसेच शिवजन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ति व बुध्दीच्या जोरावर स्वराज्य उभे केले आहे तसेच शक्ति व बुध्दी बरोबरच त्यांच्या मनामध्ये “स्वराज्याची’ आस लागली होती, ज्यावेळेस आस निर्माण होते. त्यावेळेस तुमच्या हातून भव्य – दिव्य कार्य होते. आपल्याला सर्वांची साथ मिळते.

अशा प्रकारे निस्वार्थ भावनेतून आपण जे काम करत असतो,त्यावेळेस यश नक्की मिळते. याचीच प्रेरणा घेत संजय काशिद हे समाजपयोगी असे रक्तदान शिबीर भरवतात. हे आजच्या काळाची गरज आहे. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा असून रक्तदान शिबिराच्या माध्यमातुन जनजागृती होत आहे. रक्त मिळाल्या ने एखाद्या चे प्राण वाचू शकतात व प्राण वाचवण्याचे भव्य दिव्य कार्य संजय काशिद हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here