जामखेड न्युज——
भास्कर मोरेला एक दिवसाची पोलीस कोठडी
वनविभाग आरोपीला उद्या ताब्यात घेणार
विनभंगाच्या गुन्हातील डॉ. भास्कर मोरे याला काल दिनांक १३ रोजी इंदापूर परिसरातून एलसीबी पथकाने अटक केली आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वैभव जोशी यांनी त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी आहे. उद्या वनविभागही त्यांचा अर्ज न्यायालयापुढे मांडणार आहे त्यामुळे वनविभागामार्फत किती शिक्षा होती हे पाहणे आवश्यक आहे.
गेल्या दहा दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याच्यावर आर्थिक शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप आहे. विनयभंगाचा गुन्हा तसेच वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. मोरे विरोधात आंदोलनाला जामखेड मधील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनीही पाठिंबा दिला. तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले हे उपोषण करत आहेत. काल तर जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले होते. काल आमदार रोहित पवार यांनी भेट दिली यानंतर आमदार प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. तसेच काॅलेज तक्रारी बाबत मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा केली आणि उच्च स्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की आरोपीला इंदापूर भिगवण परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक करण्यात आली होती.
भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे. एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी आहे तरीही जोपर्यंत रत्नदीप मेडिकल फाउंडेशन वर कारवाई होत नाही आणि विद्यार्थ्यांचे इतर काॅलेज मध्ये समायोजन होत नाही व विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असलेल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
भास्कर मोरे कडून शारीरिक छळ होत असल्याचा विद्यार्थ्यीनीनी आरोप केल्यानंतर जामखेड पोलीस स्टेशनला डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला डॉ मोरे याला अखेर स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस पथकाने काल इंदापूर भिगवण येथून उसाच्या शेतातून अटक केली होती.
भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
दोन विनयभंगाचे गुन्हे एक आगोदरचा व एक आताचा तसेच आगोदरचा एक ४२० चा गुन्हा दाखल आहे तसेच अँट्रासिटी गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल आहे. वन्य प्राणी संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. तसेच
शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले
भास्कर मोरेला अटक करण्यात या टीमने महत्त्वाची भूमिका पार पाडली
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी पथका बरोबर जामखेडची पोलीस टीमने महत्त्वाची भूमिका पार पाडली, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हृदय घोडके, पोलीस कॉन्स्टेबल देवा पळसे, प्रकाश मांडवे, प्रविण पालवे, श्रीकांत शिंदे, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे, राहुल गुंडू यांच्या पथकाने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली
उद्या वनविभागाकडून आरोपीला किती शिक्षा होते हे पाहणे आवश्यक आहे.