नवीन शैक्षणिक धोरण यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या – डॉ. सुनील पुराणे तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षण विस्तार अधिकारी झालेले गोकुळ गंधे यांचा सन्मान

0
356

जामखेड न्युज——

नवीन शैक्षणिक धोरण यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या – डॉ. सुनील पुराणे

 

  • तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षण विस्तार अधिकारी झालेले गोकुळ गंधे यांचा सन्मान

 

नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखुन त्यांना वाव देणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांकडून अपेक्षा खूप आहेत. पण त्या प्रमाणात भौतिक सुविधा नाहीत अशीही खंत व्यक्त केली. शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. स्वयं अर्थशासित शाळेतील शिक्षकांना पगार नाही रिकाम्या पोटी ते अंग झोकून कसे काम करणार असा प्रश्न उपस्थित केला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमाचा तालुकास्तरीय दुसरा टप्पा आज संपन्न झाला यावेळी समारोपाच्या अध्यक्षस्थानी जामखेड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुनील पुराणे तर प्रमुख म्हणून नुकतेच स्पर्धा परीक्षेतून शिक्षण विस्तार अधिकारी पदी नियुक्ती झालेले गोकुळ गंधे हे होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना डॉ. सुनील पुराणे म्हणाले की, विद्यार्थी बोलते करा, त्यांना ऐकण्याची सवय लावा नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी करण्याचे काम हे टीम वर्क आहे. यावेळी त्यांनी गणितातील अनेक संकल्पना हसत खेळत समजून दिल्या. शिक्षकांना शिकवणे अवघड काम सुलभकांनी लीलया पार पाडले असेही सांगितले. 

यावेळी प्रशिक्षणाविषयी आपल्या तीन दिवसांच्या अनुभवाचे कथन प्रशिक्षणार्थी रांजणे मँडम
डोईफोडे सर, टेकाळे सर यांनी व्यक्त केले तसेच प्रशिक्षणार्थी व शिक्षण विस्तार अधिकारी झालेले गोकुळ गंधे सर यांनी बोलताना सांगितले की, वेळेचा सदुपयोग करा, जिद्द चिकाटी मेहनत अंगी ठेवा यश निश्चित मिळणारच आहे. तर सुलभक म्हणून सुदाम वराट यांनी आपले मत व्यक्त केले.


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्याचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचारप्रवाह, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र विविध धोरणे विषयी अद्ययावत असणे आवश्यक आहे.


शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षामध्ये किमान पन्नास तासाचे प्रशिक्षण अपेक्षित आहे. शिक्षण व्यवस्थेत आता 10+2 ऐवजी 5+3+3+4 या सूत्रानुसार असणार आहे. शिक्षक होण्यासाठी आता बारावी नंतर चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भोंडवे सर तर आभार अर्जुन रासकर यांनी मानले. 

यावेळी सुलभक म्हणून जिल्हा स्तरावर कोकमठाण येथे तीन दिवस प्रशिक्षण घेऊन आलेले सात सुलभक पुढील प्रमाणे होते.
सुदाम वराट श्री साकेश्वर विद्यालय साकत,
गोपाळ बाबर श्री नागेश विद्यालय जामखेड,
सुभाष शितोळे एस सी एसटी शासकीय निवासी शाळा जामखेड,
किशोर कुलकर्णी ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड,
मधुकर बोराटे जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगाव,
भिवा साबळे नंदादेवी विद्यालय नान्नज,
गणेश शिंदे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा,
असे सात सुलभक होते.

तसेच प्रशिक्षण समन्वयक म्हणून जावेद शेख यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here