जामखेड न्युज——-
आधुनिक समाजाचे खरे कुंभार शिक्षकच – प्रा. राहुल भाकरे
शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरे
मराठी भाषा खुपच समृद्ध आहे. तरीही इंग्रजी भाषेकडे सध्या कल वाढलेला आहे. पण खरी प्रगती मातृभाषेतून होते. सध्याच्या काळात आपली भाषा आपणच जपली पाहिजे आपणच रक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. शिक्षकच मुले घडविणारे खरे कुंभार आहेत. असे मत प्रा. राहुल भाकरे यांनी व्यक्त केले.
जामखेडमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम दुसरा टप्पा
दि. 27 ते 29 दरम्यान जामखेड महाविद्यालयामध्ये सुरू आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राहुल भाकरे, प्रा. कैलास बिरंगळ हे होते.
यावेळी बोलताना प्रा. भाकरे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसाय अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. आपला मुलगा जगातील स्पर्धेत टिकला पाहिजे असे धोरण आहे. त्यामुळे आपणास सर्वाना हे धोरण यशस्वी करावयाचे आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रीय विज्ञान दिनाविषयी बोलताना प्रा. कैलास बिरंगळ म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे खरी प्रगती आहे.
यावेळी सुलभक म्हणून जिल्हा स्तरावर कोकमठाण येथे तीन दिवस प्रशिक्षण घेऊन आलेले सात सुलभक पुढील प्रमाणे होते.
सुदाम वराट श्री साकेश्वर विद्यालय साकत,
गोपाळ बाबर श्री नागेश विद्यालय जामखेड,
सुभाष शितोळे एस सी एसटी शासकीय निवासी शाळा जामखेड,
किशोर कुलकर्णी ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड,
मधुकर बोराटे जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगाव,
भिवा साबळे नंदादेवी विद्यालय नान्नज,
गणेश शिंदे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा,
असे सात सुलभक होते. तर प्रशिक्षण समन्वयक म्हणून जावेद शेख यांच्या सह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी तर आभार सुभाष शितोळे यांनी मानले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्याचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचारप्रवाह, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र विविध धोरणे विषयी अद्ययावत असणे आवश्यक आहे.
शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षामध्ये किमान पन्नास तासाचे प्रशिक्षण अपेक्षित आहे. शिक्षण व्यवस्थेत आता 10+2 ऐवजी 5+3+3+4 या सूत्रानुसार असणार आहे. शिक्षक होण्यासाठी आता बारावी नंतर चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.