जामखेड न्युज——-
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवस्नेह संमेलन प्रचंड उत्साहात संपन्न
जामखेड तालुका सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाची सांगता जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिवस्नेह संमेलनाने झाली.शिवस्नेह संमेलनाचे उद्घाटन जामखेडचे माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक व मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर आबा राळेभात ,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात,एवन टेक्स्टाईलचे संचालक विनायक राऊत,विश्वदर्शनचे गुलाबशेठ जांभळे, नगरसेवक दिगंबर चव्हाण,अमित जाधव,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल,शिक्षक बँकेच्या माजी चेअरमन सीमाताई निकम, डॉ.सादिक पठाण, मुख्याध्यापक दत्तात्रय यादव,अमोल गिरमे, संजय वारभोग, धनराज पवार आदी उपस्थित होते.
दहा दिवस चाललेल्या महोत्सवात आरोग्य शिबिर,वक्तृत्व स्पर्धा,नाट्यछटा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिवस्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गीतावर नृत्याविष्कार व एकाचढ एक अशा नाटिका सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थित प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपाची बक्षीस दिली.
सदर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा बटेवाडी,मराठी मुले जामखेड,बसरवाडी,अहिल्यादेवी नगर (जामखेड),रत्नापूर,काकडे वस्ती (बोर्ला), बांधखडक, जामखेड मुली, उगले वस्ती (नायगाव), धानोरा, सावरगाव,घोडेगाव, तेलंगशी तसेच अंगणवाडी झिक्री व संताजी नगर (जामखेड) येथील शाळांनी सहभाग घेतला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अवधूत पवार,राम निकम,दीपक तुपेरे,नवनाथ बहिर,जितेंद्र आढाव, संजय उंडे,रजनीकांत साखरे, अविनाश बोधले,एकनाथ चव्हाण,राजन समिंदर,केशव कोल्हे,मयुर भोसले,विजय जाधव,महेश यादव आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भरत देवकर यांनी,सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर तर आभार प्रा.मधुकर आबा राळेभात यांनी मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था उत्सव समितीचे वतीने करण्यात आली होती.