शिवजयंती निमित्त जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

0
340

जामखेड न्युज——

शिवजयंती निमित्त जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

 


जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा जामखेड येथे जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन जामखेड तर्फे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद शाळा मराठी मुले जामखेड येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी शिबीराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. संजय राऊत हे होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तपासणी शिबीराचे आयोजन जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन जामखेड तर्फे करण्यात आले आहे. या मध्ये डेंटिस्ट, बालरोगतज्ज्ञ, आणि जनरल अशा ११ डॉक्टर्स ची टीम सर्व विद्यार्थ्यांची सर्वांगीण तपासणी करणार असून पुढील काळात अशाच पद्धतीने वेगवेगळी सामाजिक उपक्रमे असोसिएशन तर्फे राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी डॉ. सागर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना. आपल्या दातांची निगा कशी राखली पाहिजे कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली. तर डॉ. चौरे यांनी विद्यार्थ्यांना जंग फुड, बिस्किटे, टोस्ट, चाऊमीन सारखे पदार्थ कसे घातक आहेत. त्या ऐवजी भाजी पाला, भाकर, फ्रुट, अंडी यांसारखे सकस आहार घेण्याचा सल्ला दिला.

जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन जामखेड तर्फे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील ३५१ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप चौरे, डॉ. विकास शिंदे, डेंटिस्ट – डॉ. मिसाळ प्रवीण, डॉ. सागर शिंदे, डॉ. लद्दड सर, जनरल – डॉ. अशोक बांगर, डॉ. राजकुमार सानप, डॉ. जतीन काजळे, डॉ. पांडुरंग सानप, सचिव डॉ. संजय राऊत अध्यक्ष, डॉ. अनिल गायकवाड, उपाध्यक्ष, डॉ. बेलेकर सर, शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय कर्डिले सर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा. नासीर सय्यद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सागर माकुडे सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय कर्डिले सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. संजय कर्डिले सर, मा. कदम सर, मा. नितीन मोहळकर, मा. सागर माकुडे सर, वंदना मोरे मॅडम, धाऊड मॅडम, मोहोळकर मॅडम, म्हेत्रे मॅडम, वराडे मॅडम, साबळे मॅडम, कल्पना मोरे मॅडम, पोले मॅडम, साळे मॅडम, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

चौकट…
जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन जामखेड तर्फे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिरा बरोबरच औषधांसह विद्यार्थ्यांना गिफ्ट म्हणून पेनचे वाटप करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here