जामखेड न्युज——
जामखेडमध्ये हुबेहूब दिसणारे मनोज जरांगे पाटील बसले आमरण उपोषणाला

गेल्या सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे भुतवडा येथील हनुमंत मोरे हे देखील आज गुरुवार दि १५ फेब्रुवारी पासुन जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण बसले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील गेल्या १० फेब्रुवारी २०२४ म्हणजे सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तरी देखील याबाबत सरकारने कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा म्हणून आता मनोज जरांगे पाटलांसारखे दिसणारे हुबेहूब जामखेड तालुक्यातील भुतवडा गावचे तरुण हनुमंत मोरे हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत.

हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून काल दि १४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज गुरवार दि १५ फेब्रुवारी पासुन सकाळी हनुमंत मोरे हे जामखेडच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
याबाबत कालच उपोषण कार्यकर्ते हनुमंत मोरे व मराठा क्रांती मार्चाच्या वतीने जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले होते.

मनोज जरांगे पाटिल यांच्या सारखेच दिसणारे भुतवडा गावचे तरुण उपोषणास बसले आसल्याने त्यांना भेट देण्यासाठी व पहाण्यासाठी नागरीकांचा गर्दी होत आहे. यावेळी त्यांनी उपोषणा दरम्यान बोलता सांगितले की मी जरांगे पाटिल यांच्या सारखा दिसतो याचा मला अभिमान वाटतो. मोरे यांनी जरांगे पाटिल यांना पाठिंबा देण्यासाठी ते आंतरवाली सराटी येथे देखील गेले होते.

तसेच जामखेड येथुन मुंबई येथे निघालेल्या मोर्चात देखील ते त्या वेळी सहभागी झाले होते. तसेच मराठा समाजाच्या आसलेल्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने होणार्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी प्रा .मधुकर (आबा) राळेभात, शहाजी (काका) राळेभात, विकास (तात्या) राळेभात, मंगेश (दादा) आजबे, संभाजी राळेभात, महादेव डोके, जयसिंग डोके, पवनराजे राळेभात, अवदुत पवार, तात्यासाहेब बांदल, डॉ भरत देवकर, डॉ प्रशांत गायकवाड, महेश यादव, दादासाहेब नागरगोजे, विष्णु सागडे, सलीम भाई शेख, सुनिल नवगीरे, लखन तुपसुंदर, पांडुरंग मोरे, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





