जामखेड मधील हुबेहूब जरांगे पाटील, उद्या पासून करणार उपोषण

0
1283

जामखेड न्युज——

जामखेड मधील हुबेहूब जरांगे पाटील, उद्या पासून करणार उपोषण

सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासुन आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला बुधवारी जामखेड तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले तसेच गुरुवार पासून हुबेहूब जरांगे पाटील यांच्या सारखे दिसणारे भुतवडा (जामखेड) येथील रहिवासी हनुमंत मोरे उद्या पासून उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले.


मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या जामखेड तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेड शहरात मोटारसायकल रॅली काढली.

बंदमुळे जामखेड शहर व परिसरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. तसेच जामखेड तालुक्यातील खर्डा, जवळा, नान्नज, अरणगाव, साकत, हळगाव, पिंपरखेड, तेलंगशी यासह अनेक गावातही कडकडीत बंद पाळल्यामुळे व्यापारी, दुकानदार, टपरीधारक, भाजीपाला बाजार या सर्वांनी बंदला पाठींबा दिल्यामुळे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आभार मानण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून त्यांच्या सारखे दिसणारे हनुमंत मोरे हे जरांगे पाटील यांच्या पेहराव करून आले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते उद्या गुरुवार पासून उपोषणास बसणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी व इतर काही मागण्यासाठी जरांगे पाटील गेल्या चार दिवसापासून उपोषणास बसले आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून आता पाटलांसारखे दिसणारे हुबेहूब हनुमंत मोरे हे देखील उपोषण करणार आहेत.


हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे तर दुसरीकडे जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर आता उद्यापासून हनुमंत मोरे हे उपोषण करणार आहेत.


यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घोषणा देण्यात आल्या. एक मराठा लाख मराठा.,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापचं या घोषणा देत तहसीलदार गणेश माळी यांना या संदर्भाचे निवेदन उपोषण कार्यकर्ते हनुमंत मोरे व मराठा क्रांती मार्चाच्या वतीने देण्यात आले .

मराठा क्रांती मोर्चाचे अवदुत पवार, विकास राळेभात, डॉ. भरत देवकर, डॉ प्रशांत गायकवाड, गणेश कोल्हे, तात्याराम बांदल, बापुसाहेब पवार, मोईज शेख व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here