जामखेड न्युज——-
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर मार्ग मिळेलच – डॉ. अरूण अडसुळ
जामखेड महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन
जीवनात कोणतेही काम करण्यासाठी दुर्दम्य इच्छा शक्ती हवी असते. त्या जोरावर आपण कठिणातील कठीण काम करू शकतो. यासाठी अंत:करणातून पेटून उठावे लागते. न्युनगंड काढून टाकावा लागतो. लाजरे बुजरे पणा सोडावा लागतो. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने व प्रसन्न चेहऱ्याने सामोरे जा यश हमखास मिळेल असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल अडसुळ यांनी व्यक्त केले.
जामखेड महाविद्यालय जामखेड व ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. सैनिक. कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण अडसुळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख होते. यावेळी उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, संचालक अशोक शिंगवी, अरूण देशमुख, प्राचार्य एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, अविनाश फलके, श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश अडसुळ, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, न्यू इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, ल. ना. होशिंगचे उपमुख्याध्यापक बी. ए. पारखे, गाडेकर सर, गौतम केळकर,विठ्ठल रेडे, रमेश चांदेकर, यांच्या सह सर्व प्राध्यापक, शिक्षक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अडसुळ म्हणाले की, आपण ग्रामीण भागातील आहोत हे डोक्यातून काढून टाका आतून पेटून उठा आत्मविश्वास नसल्याने न्युनगंड निर्माण होतो. त्यामुळे आत्मविश्वासाने कामाला सामोरे जा. आपण जर समाजात प्रभाव निर्माण केला तरच समाज आपल्याला किंमत देतो. स्वयंसिद्धतेसाठी स्वतः लाच प्रयत्न करावे लागणार आहेत. असेही सांगितले. तसेच मोबाईल च्या माध्यमातून आपल्या हातात खिशात जगातली लायब्ररी आहे. तिचा सुयोग्य वापर करा मानसिक समाधानापेक्षा आत्मिक समाधान महत्त्वाचे आहे आत्मिक समाधानासाठी जगा स्वतः ला स्वयंशिस्त हवी आहे. वेळेचे महत्त्व ओळखा
वेळच्या वेळी काम करा, कोणाला तरी रोड माँडेल म्हणून स्विकारा असे सांगितले.
वक्तृत्वाच्या प्रभावी शस्त्राने आपले ज्ञान इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी व लोकांची मने जिंकून समाज प्रबोधनाच्या उद्देशाने तसेच युवकांनी चाकोरीबद्ध शिक्षण न घेता भविष्यकाळातील गतिमान समाज जीवनाच्या विविधांगाशी संबंधित असणाऱ्या ज्ञानाची क्षितीजे आत्मसात करून आजच्या समस्यावर विचारमंथन करावे या उद्देशाने संस्था हा उपक्रम दरवर्षी राबवत आहे. हे स्पर्धेचे बारावे वर्ष आहे.
यावेळी बोलताना दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की,
जगातील क्रांतीची सुरुवात वाणी व लेखणीतून झालेली आहे. हे बारावे वर्ष आहे. दहा वर्षे स्पर्धा जिल्हास्तरीय होती. स्पर्धेचा आवाका वाढल्याने गेल्या दोन वर्षांपासून आता राज्यस्तरीय केलेली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक येत आहेत.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास ७००१ रुपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकास ५००१ रूपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय क्रमांकास ३००१ रूपये व स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र
उत्तेजनार्थ १००१ रूपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र,
उत्तेजनार्थ १००१ रूपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र
असे बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण सायंकाळी स्पर्धा संपल्यानंतर लगेच होणार आहे.
स्पर्धचे परिक्षक म्हणून प्रा. भास्कर मोरे दादा पाटील महाविद्यालय कर्जत, प्रा. सुखदेव कोल्हे दादा पाटील महाविद्यालय कर्जत हे आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम एल डोंगरे यांनी केले तर आभार अनिल देडे यांनी मानले.