जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून राजुरीच्या दोन युवकांना तालुकापातळीवर काम करणाची संधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक कार्याध्यक्षपदी राजुरीचे सरपंच सागर कोल्हे तर सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी काकासाहेब कोल्हे यांची निवड झाली आहे. यामुळे राजुरीच्या दोन युवकांना आमदार रोहित पवार यांनी तालुकापातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथे कार्यकारिणी निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात कार्याध्यक्ष पदी राजुरी चे सरपंच सागर कोल्हे तर सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी काकासाहेब कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.
राजुरी गावातील दोन युवकांना आमदार रोहित पवार यांनी तालुक्यात काम करण्याची संधी दिली आहे. निवडीचे पत्र देताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, राजेंद्र पवार, विजयसिंह गोलेकर सह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सागर कोल्हे हे आमदार रोहित पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. जनतेतून बहुमताने सरपंच म्हणून ते निवडून आले आता आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर तालुका कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
काकासाहेब कोल्हे हे राजुरी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत, गेल्या 05 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून काम करत होते, तालुक्यातील जे काही आमदार मा श्री रोहित दादा पवार यांचे विश्वासु सहकारी आहेत त्यामध्ये काकासाहेब कोल्हे यांचे नाव घेतले जाते, कर्जत झालेल्या पक्षाच्या तालुका कार्यकरणी मध्ये रोहित दादा पवार यांनी काकासाहेब कोल्हे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली.