जामखेड न्युज——
मनोज जरांगे यांच्या पाठिशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार नारळातून जामखेड मधील चित्रकाराने साकारले चित्र
जामखेड येथील शिक्षक, चित्रकार नवनाथ बहिर यांनी आतापर्यंत खडू शिल्प, वेगवेगळ्या महापुरुषांची रांगोळी, वेगवेगळ्या फळावर वेगवेगळे सामाजिक विषय आजपर्यंत मांडलेले आहेत. त्यांच्या चित्राची व शिल्पाची राज्य पातळीवर निवड झालीली आहे. सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन गाजत आहे.
राज्यातून अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या आंदोलनामागे कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच विषय घेऊन चित्रकार नवनाथ बहिर यांनी नारळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र तर वरील बाजूवर मनोज जरांगे पाटील यांचे चित्र साकारले आहे. यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हा संदेश दिला आहे.
सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर मोठ्या संख्येने आंदोलने झाली तेव्हा राज्यात नव्हे देशात नव्हे तर परदेशातही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली. नेमके आंदोलनामागे कोण असा प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे.
हाच सामाजिक विषय घेऊन चित्रकार नवनाथ बहिर यांनी नारळाचे दोन सारखे भाग करून आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र तर एका नारळ करवंटीवर मनोज जरांगे पाटील यांचे चित्र साकारले आहे. यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आहेत असा संदेश देणारे हे चित्र खरोखरच खुपच बोलके आहे.
नवनाथ बहिर यांनी आतापर्यंत प्रत्येक जयंती पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे सामाजिक विषय आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून मांडलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या महापुरुषांच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. आता नारळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र तर बाहेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे चित्र काढलेले आहे.
अनेकवेळा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे का असा सवाल उपस्थित केल्यानंतर जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमच्या मागं कोणी नाही, फक्त एकच आहे तो म्हणजे राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज. आम्ही आमच्या समाजाचे दुःख मांडतो, जे दुःख आहे ते मांडतो. त्यामुळे जर आमच्या मागे कोण सत्ताधारी असते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोलायला लावले असते तर हे सगळं बोलता आले नसते असंही त्यांनी यावेळी सांगितले. पण चित्रकारांने आपल्या चित्रातून मनोज जरांगे पाटील यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आहेत हे दाखवले आहे.
उद्या शुक्रवार दि. 9 रोजी मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे जाहीर सभा आहे. यासाठी ते जामखेड मार्गी श्रीगोंदा येथे जाणार आहेत. तेव्हा चित्रकार नवनाथ बहिर यांनी नारळात व नारळ करवंटीवर काढलेले मनोज जरांगे पाटील यांचे चित्र जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे.