जामखेड न्युज——
मराठा आरक्षणाची पुर्ती झाल्याने तरुणांची वचन पुर्ती, हजार मीटर लोटांगण
मराठा आरक्षणाला यश आल्याने जवळा येथील तरुण दत्तात्रय शेणमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक( जवळा फाटा) ते जवळा गावचे ग्रामदैवत जवळेश्वर मंदिरापर्यंत एक हजार मीटर लोटांगण घातले. यावेळी जवळा पंचक्रोशीतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला यश मिळाल्याने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जवळा येथे फटाके फोडण्यात आले व पेढे भरवण्यात आले, तसेच डीजेच्या तालावर वाजत गाजत गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजातील तरुणाई डीजे च्या तालावर थिरकली. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.
यावेळी मराठा आरक्षणाला यश आल्याने जवळा येथील तरुण दत्तात्रय शेणमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक( जवळा फाटा) ते जवळा गावचे ग्रामदैवत जवळेश्वर मंदिरापर्यंत एक हजार मीटर लोटांगण घातले. यावेळी जवळा पंचक्रोशीतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. व यावेळी शिंदे सरकारचे आभार मानले व मराठा समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.