शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे जामखेडच्या इतिहासात प्रथमच शिक्षण विभागाकडून पत्रकारांचा सन्मान

0
276

जामखेड न्युज——

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेडच्या इतिहासात प्रथमच शिक्षण विभागाकडून पत्रकारांचा सन्मान

 

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळा भेटी, ग्रामस्थ, पालकांशी संवाद तसेच काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व कामचुकार शिक्षकांवर कारवाईचा बडगा यामुळे शिक्षण विभागाला एक चांगली शिस्त लागली याची सर्व पत्रकारांनी दखल घेत चांगली प्रसिद्धी दिली. यामुळे तालुक्याच्या गुणवत्ता वाढीसाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे असे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सांगितले.


जामखेड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शिक्षण विभागातर्फे गटशिक्षणाधिकारी यांनी पत्रकार दिन साजरा करत तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, विक्रम बडे, विस्तार अधिकारी केशव गायकवाड, सुरेश मोहिते, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, शिक्षक संघटनेचे नेते राम निकम, नारायण राऊत, किसनराव वराट, विजय जाधव, मुकुंद सातपुते, नवनाथ बहिर, केशव कोल्हे, एकनाथ चव्हाण, अरूण मुरूमकर, गोकुळ गायकवाड, वरिष्ठ सहाय्यक बाळासाहेब गांगर्डे, श्रीमती काव्या कात्रजकर, रमेश निमसे, नानासाहेब मोरे आदी मान्यवर व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी केले.

यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक गुणवत्ता वाढ झाली आहे. या मध्ये विध्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांना पत्रकारांनी प्रेरणा व प्रोत्साहान दिले. चांगल्या कामाचे कौतुक करून त्याची प्रसिद्धी दिली.

त्यामुळे शिक्षक, अधिकारी, यांनी अधिक जोमाने काम चालू केले, त्यामुळे जामखेड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यात तालुक्यातील पत्रकारांचा सिहांचा वाटा असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले.

नुकतीच मा. न्यायालयाच्या कमिटीने प्रत्येक शाळेवर जाऊन तपासणी केली, त्यांनीही तालुक्यातील शाळेची स्वच्छता व गुणवत्ता याविषयी समाधान व्यक्त केले. कापसेवस्ती सारख्या शाळेवरील मुले 43 चा पाढा म्हणतात ही अभिमानास्पद बाब आहे.

यावेळी नायगाव वस्ती शाळेत केशव कोल्हे व अरूण मुरूमकर यांनी पालकांना सहभाग वाढवण्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम शाळेत घेतला हा व्हिडिओ दाखविला तर स्वच्छ व सुंदर शाळा कशी असावी तर नाणेवाडी सारखी शाळा असावी याचबरोबर वस्ती शाळेतील चिमुकले ४३ चे पाढे म्हणतात ही बाब अभिमानास्पद आहे असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here