जामखेड न्युज——
पवारवस्ती पाडळी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश
चिमुकल्यांनी आत्मविश्वास दाखवून दिला
तालुक्यास्तरीय क्रीडा स्पर्धेत पाडळी येथील पवार वस्ती शाळेतील चिमुकल्यांनी आत्मविश्वास दाखवत चमकदार कामगिरी केली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहान गटात पवारवस्ती (पाडळी) शाळेने मिळविला तालुक्यात दुसरा क्रमांक २० मुलांपैकी 09 मुले निवडून शाळेला मैदान नसताना केंद्र स्तरावर कबड्डी व खो खो मध्ये प्रथम क्रमांक पटकावून आज तालुका स्तरावर खो खो मध्ये दुसरा क्रमांक मिळविला त्याबद्दल मुलांचे व शिक्षकांचे कौतुक झाले. 09 मुलांत 2 री ते 4 थी चे 08 विद्यार्थी व 5 वी चा एक विद्यार्थी होता.
समोरील प्रत्येक संघात 5वी चे विद्यार्थी असताना सुद्धा मुलांनी आत्मविश्वास दाखविला *सर आम्ही हारलो तरी खेळणारच याच आत्मविश्वासावर मुलांनी लहान गटात तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला
तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे अमोल सातपुते व बाळू जरांडे शिक्षकांचे कौतूक करून अभिनंदन केले.