Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या नागेश विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारणार विश्वविक्रम

नागेश विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारणार विश्वविक्रम

0
681

जामखेड न्युज——

नागेश विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारणार विश्वविक्रम

 

 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये 32000 स्क्वेअर फुट मध्ये गोलाकार रचनेत भारताचा नकाशा व त्यामध्ये जय हिंद – जय भारत नाव आहे तसेच 75 वा प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवाची सुरुवात होत असल्याने 75 मीटर तिरंगा फडकवत विद्यार्थी रचनेतील अक्षर चित्र तयार होणार आहे. हे चित्र कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयुर कृष्णाजी भोसले हे साकारणार आहे.

यामध्ये श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालयातील 2500 विद्यार्थी एनसीसी कॅडेट शिक्षक ग्रामस्थ आजी माजी सैनिक हातात तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत.


तसेच 17 महाराष्ट्र बटालियनचे श्री नागेश विद्यालय एनसीसी युनिट उत्कृष्ट संचलन सादर करणार आहे.


हे चित्र आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रेरणातुन व संकल्पनेतून स्थानिक स्कूल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात येणार आहे.त्या मुळे पुन्हा एकदा जामखेडचे नाव देशपातळीवर चमकणार अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के यांनी दिली तसेच 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण होणार आहे. 7.30 ते 9 .30 या वेळेत हे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तेव्हा हा विश्वविक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नागेश विद्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


75 वा प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव निमित्त भव्य मानवी रचनेतील विद्यार्थ्यांपासून बनवलेले कलाकृती पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आव्हान केले.

75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 32000 स्क्वेअर फुट मध्ये भव्य भारताचा देशाचा नकाशा जय हिंद जय भारत नाव व 75 मीटर तिरंगा विद्यार्थी हातात घेऊन बैठक व्यवस्थेत चित्र साकारण्यात येणार आहे हा विश्व विक्रम पाहण्यासाठी सर्वांनी जरूर या
26 जानेवारी 2024
वेळ सकाळी 7.30 वाजता
श्री नागेश विद्यालय जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!