जामखेड न्युज——
जामखेडमध्ये निलंबनाच्या कारवाईमुळे चिडलेल्या सहाय्यक अभियंत्याचा कर्मचारी व ग्राहकांवर हल्ला
निलंबनाची कारवाई झाल्यामुळे चिडलेल्या
जामखेड येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने प्रभारी अधिकारी यांची केबीन आर्थिंग राँडच्या साहाय्याने तोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त करत कार्यालयातील कर्मचारी व आलेल्या ग्राहकांवर हल्ला करत जखमी केले अशा प्रकारचा गुन्हा अमोल काळे उपव्यवस्थापक महावितरण कर्जत यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सहाय्यक अभियंता प्रल्हाद टाक यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
जामखेड महावितरणच्या कार्यालयातील या
प्रकारामुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.
फिर्यादी नामे अमोल काळे (उप व्यवस्थापक, महावितरण, कर्जत कार्यालय) यांनी पोलीस ठानेस हजर राहून कळविले की, आरोपी नामे प्रल्हाद सदाशिव टाक (सहा अभियंता) यांचेवर त्यांचे प्रभारी अधिकारी श्री शरद चेचर (उप कार्यकारी अभियंता) यांनी पाठविलेल्या रिपोर्ट वरून वरिष्ठ कार्यालयाने दिनांक 02.01.24 रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.
निलंबनाची कारवाई झाल्याने आरोपीने जामखेड येथील विद्युत वितरण कार्यालयातील प्रभारी अधिकारी यांचे केबिन दिनांक 05.01.2024 रोजी 13.30 वा चे सुमारास अर्थीग रॉड च्या सहाय्याने तोडले तसेच कार्यालयातील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. कार्यालयातील शासकीय कर्मचारी व ग्राहक यांचेवर हमला करून साक्षीदार यांना जखमी केले तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे.
फिर्यादी यांचे अशा तक्रारवरून आरोपी विरुद्ध कलम 353, 332, 352, 504, 506 भा द वि सह कलम 3 सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.