अक्षय कलशाची जामखेड शहरात भव्य-दिव्य मिरवणूक

0
479

जामखेड न्युज——

अक्षय कलशाची जामखेड शहरात भव्य-दिव्य मिरवणूक

अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण होत आहे. या भव्य श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्त अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात मंत्रोच्चारण केलेला कलशाची जामखेड शहरात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

अयोध्येतील पूजन केलेल्या अक्षता देशभरामध्ये घरोघरी पोहोचल्या जाणार आहेत. या अक्षतांचा मंगल कलशचे जामखेड शहरांमध्ये आगमन झाले असून या कलशाचे शहरांमध्ये भव्य दिव्य स्वागत करून वाद्यवृंद, घोडे, फटाक्यांच्या आतिषबाजीत शोभायात्रा काढण्यात आली.

शहरांमधील सर्व महिला भगिनींनी या कलशाचे पूजन करून श्रीराम मंदिराच्या परिसरात आनंदोत्साह साजरा केला. यावेळी डॉ. प्रकाश खैरनार, उमेश देशमुख, डॉ. एकनाथ मुंडे, नगरसेवक अमित चिंतामणी, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, मोहन (मामा) गडदे, राजेंद्र देशमुख, विवेक कुलकर्णी, दिगंबर राळेभात, बाळासाहेब दळवी, संभाजी मुळे, सोमनाथ राळेभात, मनोज कुलकर्णी, अँड. प्रवीण सानप, प्रा. संजय राऊत
नगरसेवक बिभिषण धनवडे, बबलू टेकाळे, डॉ. महेश मासाळ, शिवकुमार डोंगरे, रणजीत सुराणा, दिपक ददियाल, वैभव कार्ले, ऋषिकेश मोरे, आण्णा जाधव, योगेश औचरे यासह शहरातील विविध मंडळ व राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते या शोभा यात्रेकरिता उपस्थित होते.

शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण माळशिरस येथील सनई पथक व मिरजगाव येथील बाल वारकरी मंडळ होते.


२५ डिसेंबर पर्यंत हा कलश शनी मंदिर येथे ठेवला जाणारा असून शहरातील सर्व भाविकांनी या अक्षता कलशाच्या पूजनाचा लाभ घ्यावा. 

श्रीराम मंदिर २२ जानेवारी २०२४ रोजी सर्वांसाठी खुले होणार असून त्या दिवशी सर्वांनी घरोघरी दीपोत्सव साजरा करावा असेही आवाहन नगरसेवक अमित चिंतामणी व मान्यवरांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here