जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार यांना अटक करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
कालच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल व्यापारी व नागरिकांचे आभार – संचालक अमोल राळेभात
युवकांचा आधारस्तंभ म्हणून जन सामान्यांत ओळखले जाणारे महाराष्ट्राचे युवा नेतृत्व तसेच कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे संघर्ष यात्रा संपवून संघर्ष यात्रेचे मुद्दे व एमआयडीसीचा प्रश्न मांडण्यासाठी विधान भवनावर धडक मोर्चा घेवून जात असताना पोलिसांनी रोहित दादा यांना १२ डिसेंबर २०२३ रोजी अटक करून दबावतंत्राचा वापर केला होता.
त्या अटकेच्या निषेधार्थ दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी जामखेड बंदचे निवेदन तहसीलदार साहेब जामखेड यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, शहाजी काका राळेभात,अमित जाधव, प्रशांत राळेभात, अशोक घुमरे, कुंडल राळेभात, नितीन मुरूमकर, राजेंद्र गोरे, डॉ. नरसाळे, उगले सर, दत्तात्रय सोले, वैजिनाथ पोले, संदीप गायकवाड तसेच इतर अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
काल दि. १३ रोजी जामखेड व खर्डा येथील व्यापारी व नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी जाहीर आभार मानले.
यावेळी अमित जाधव, शहाजी काका राळेभात तसेच अमोल राळेभात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. अमोल राळेभात यांनी कर्जत-जामखेड मध्ये महाराष्ट्रातील युवा तसेच नवीन विचारांना चालना देणारे नेतृत्व रोहित दादा पवार यांच्या रूपाने उभारत असताना हे नेतृत्व दाबण्याचं काम या सरकारने केल आहे.त्यांनी जो काही दबावतंत्राचा वापर केला, एका युवा उभरत्या नेत्यास अटक केली तसेच महिला कार्यकर्त्याना उचलून गाडीत डांबून ठेवल हे खूपच निंदनीय आहे.
तसेच कर्जत- जामखेड मध्ये एमआयडीसी येण्यासाठी रोहित दादा यांनी मागील ४ वर्षे स्वतः सतत पाठपुरावा केला,ती एमआयडीसी रद्द करून दुसरीकडे नेण्याचा घाट या सरकारने केला आहे.
युवकांसाठी रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे, मजुरांचे, महिलांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न याकडे पाठ फिरवून फक्त गळचेपी करण्याचे व युवा विचारांना दाबण्याचे काम हे सरकार करत आहे.
याचा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोल राळेभात यांनी जाहीर निषेध करून जामखेड शहरातील सर्व व्यापारी वर्गाने या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.