जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील कर्मचारी संपामुळे शाळा व सरकारी कार्यालये ओस
जामखेड तालुक्यातील संपकरी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी कार्यालयांमधील रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी विविध सरकारी, निमसरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. आज जामखेड तालुक्यातील माध्यमिक शाळा व सरकारी कार्यालये ओस पडले होते. कामकाज ठप्प झाले होते.
आज सर्व संपकरी कर्मचारी सकाळी दहा वाजता ल. ना. होशिंग विद्यालयात जमले आणि येथून तहसीलदार कार्यालयावर कर्मचारी हक्काच्या घोषणा देत मोर्चा आणला व याठिकाणी जाहीर सभा झाली. यावेळी शिवाजीराव ढाळे, बाळासाहेब पारखे, जाकिर शेख, मुख्याध्यापक आप्पा शिरसाठ, ईश्वर कोळी, विजय हराळे, दशरथ कोपनर, दत्तात्रय काळे, भरत लहाने, युवराज ढेरे, पी. टी गायकवाड, मयुर भोसले, अनिल देडे, प्रशांत जाधव, सुखदेव कारंडे, राजेंद्र वळेकर, राजेंद्र पवार, गर्जे, नागरगोजे, संतोष देशमुख, राजकुमार थोरवे, अर्जुन रासकर, संतोष पवार, दिपक सुरवसे, महादेव मत्रे, पवार ज्योती, बाळासाहेब लटके, सतिश भोगे, प्रशांत जमदाडे, अतुल जोशी यांच्या सह अनेक विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन दिले.
यावेळी जाकिर शेख, मुख्याध्यापक आप्पा शिरसाठ, दत्तात्रय काळे, दशरथ कोपनर, विजय हराळे, शिवाजीराव ढाळे, पवार ज्योती, पी. टी. गायकवाड, प्रशांत जमदाडे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी केले.
यावेळी नायब तहसीलदार मनोज भोसेकर म्हणाले की, जुनी पेन्शन योजना साठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हे निवेदन प्राप्त झाले आहे हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणार आहे.
आजच्या संपात शिक्षक-शिक्षकेतर व चतुर्थश्रेणी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यक यासह अनेक विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
आजच्या संघातील प्रमुख मागण्या
जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी
चार लाख पदांसह अनुकंपा नियुक्त्या विनाशर्त कराव्यात
केंद्रासमान सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावेत
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नयेत
खासगी कंत्राटी धोरण रद्द करावे, कंत्राटींची सेवा कायम करावी
चतुर्थश्रेणी, वाहनचालक भरतीवरील निबंध हटवावेत यासह सन २००५ नंतर राज्य सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह १९ मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी मार्च महिन्यात बेमुदत संपही करण्यात आला होता.
मार्च महिन्यातील संपातील मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर हा संप स्थगित करण्यात आला होता. परंतु, आठ महिने उलटूनही त्याबाबतचा ठोस निर्णय न झाल्याने राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत.
राज्यभरातील सुमारे १७ लाख कर्मचारी संपावर आहेत. आज जामखेड तालुक्यातील सर्व शाळा व सरकारी कार्यालये ओस पडले होते.
शिवाजीराव ढाळे
दोन्ही मुख्यमंत्री वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. यामुळे हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल. जेणेकरून सरकारला कर्मचाऱ्यांच्या हक्काची पेन्शन मिळेल
विजय हराळे
सरकार टोलवाटोलवी करत आहे. तीव्र लढा उभारणारण
दशरथ कोपनर
मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत संप सुरू राहील
पवार ज्योती
आता माघार नाही. आम्ही संपाची तीव्रता अधिक व्यापक करणार आहोत.
प्रशांत जमदाडे
महसूल कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला आहे.