स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने पुण्याच्या व्यावसायिकाला जामखेडमध्ये दहा लाखाला लुटले, दोन आरोपींना अटक

0
1899

जामखेड न्युज——

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने पुण्याच्या व्यावसायिकाला जामखेडमध्ये दहा लाखाला लुटले

दोन आरोपींना अटक


स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने पुणे येथील व्यावसायिकाला जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात बोलावले तेथे आल्यानंतर सहा अनोळखी व्यक्तींनी व्यावसायिकास काठी व हाताने बेदम मारहाण केली. व व्यावसायिकाकडील दहा लाख अकरा हजार रुपये तसेच मोबाईल लुटला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे येथील व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून लुटण्यात आले. ही घटना जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात दि. ८ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी रघुनाथ ऋषिकेश शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९५, १२० (ब), ५०६ प्रमाणे ६ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

कुशी भोसले, कारभारी भोसले यांच्यासह इतर ४ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. दोन अनोळखी इसम ३० ते ३५ आणि इतर चार अनोळखी इसम २५ ते ३० वयोगटातील आहेत.

पुणे येथील व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात बोलविण्यात आले. तेथे आल्यानंतर व्यावसायिकास काठी व हाताने बेदम मारहाण करण्यात आली.

त्याचप्रमाणे चाकूने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. व्यावसायिकाकडून १० लाख ११ हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेतला.


या घटनेनंतर कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगोदरही सोन्याच्या आमिषाने मोठ्या प्रमाणात लुटमार व खुनही झालेले आहेत. यामुळे नागरिकांनी सावध राहावे.

कारभारी भोसले व निर्गुणा काळे या दोन आरोपींना जामखेड पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. 14 तारखेपर्यंत वरील दोन्ही आरोपींना अटक पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here