जामखेड न्युज——
स्पर्धेच्या युगात जीवनात यश मिळवण्यासाठी ज्ञानाबरोबर संस्कार महत्त्वाचे – रमेश गुगळे
एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धावपळ असते. या धावपळीच्या जीवनात कोणतातरी छंद जोपासणे गरजेचे असते. या छंदामुळे आपल्यामध्ये नीटनेटके पणा, चिकाटी, स्वच्छता, टापटीपपणा येतो यामुळे छंद आवश्यक आहे. चित्रकला हा एक छंदच आहे.
एच. यु. गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या वीस वर्षांपासून शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आज श्री साकेश्वर विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती रमेश गुगळे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दत्ता काळे होते यावेळी राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, चित्रकला शिक्षक त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेश गुगळे म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाबरोबर सुसंस्कारी असणे आवश्यक आहे फक्त ज्ञान असुन संस्कार नसतील तर काही उपयोग नाही.
आपण जरी ग्रामीण भागातील असलो तरी ग्रामीण भागाचा कधीही न्युनगंड बाळगू नका ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर गेलेले आहेत. त्यामुळे ज्ञानाबरोबर सुसंस्कारी व्हावे असा सल्लाही दिला.
यावेळी बोलताना रमेश गुगळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा वराट व ज्ञानेश्वरी मुरूमकर यांनी केले तर प्रस्ताविक सुदाम वराट व आभार राजकुमार थोरवे यांनी मानले.