जामखेड न्युज——
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करा – आमदार प्रा. राम शिंदे
आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात – तहसीलदार योगेश चंद्रे
दोन दिवस जामखेड तालुक्यातील काही भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसांमुळे शेतीतील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी तहसीलदार यांना सांगितले तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना आजपासून पंचनामे करावेत असे आदेश दिले आहेत व आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत मिळाली म्हणून आमदार प्रा. राम शिंदे यांनी ताबडतोब तहसीलदार यांना फोन करून तालुक्यात ज्या ठिकाणी अवकाळी पावसांमुळे नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करावेत असे सांगितले तहसीलदार यांनीही तलाठी, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. आणि आजपासून पंचनामे सुरू झाले यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२८ नोव्हेंबर रोजी जामखेड तालुक्यात अवकाळी वारा व पावसामुळे शेती व इतर मालमत्तेचे नुकसान
झाल्याची माहिती मिळत असून जामखेड तालुक्यातील ग्रामस्तरीय समिती सदस्य तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी आजपासून तातडीने व प्रत्येक्ष नुकसानग्रस्त शेतात जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात करावी असे आदेश तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिले आहेत.
याबाबत दिलेल्या आदेशत म्हटले आहे की, काल दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठीमुळे पिकांचे नुकसान झालेले असल्यास ग्रामस्तरीय समिती यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी उद्या दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करुन विहीत नमुन्यात तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावेत.
तसेच शेतीपिकाव्यतिरीक्त झालेले नुकसानीबाबत सर्वसबंधीत तलाठी यांनी अहवाल तहसिल कार्यालयास तात्काळ सादर करावंत, पिक पंचनामे करतांना ग्रामस्तरीय समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन कुणीही वाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. असा आदेशच तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिला आहे.
या आदेशाच्या प्रति पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सर्व सबंधीत ग्रामस्तरीय समितीचे अधिकारी व कर्मचारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.