सिंचन विहिर व फळबाग योजनेसाठी घरबसल्या आँनलाईन अर्ज करावेत – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
844

जामखेड न्युज——

सिंचन विहिर व फळबाग योजनेसाठी घरबसल्या आँनलाईन अर्ज करा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. सिंचन विहिरीसाठी चार लाख रु तर फळबाग साठी दीड ते दोन लाख रु अनुदान दिले जाते. यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून हे लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्सुक असतात. यापूर्वी शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असे. यामध्ये वेळेचा अपव्यय होत असे. तसेच आपला अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे याची माहिती लाभार्थ्यांना मिळत नसे.

त्यामुळे शासनाने सिंचन विहीर व फळबाग योजनेचे अर्ज करण्यासाठी Maha EGS Horticulture हे app तयार केले आहे. या app च्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.

App ची वैशिष्ट्ये-
१. ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून अर्ज करता येणार.
२. कमी वेळात अर्ज।पंचायत समितीला दाखल होणार
३. अर्ज आधी ग्रामपंचायत लॉगिनला व त्यानंतर पंचायत समिती लॉगिनला येणार
४. ऑनलाईन अर्जावर तात्काळ कार्यवाही केली जाणार
५. अर्जाची सद्यस्थिती लाभार्थ्यांला समजणार

-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड.

राज्य शासनाच्या माध्यमातून विहिरीसाठी ४ लाख रूपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे.तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.लवकरच शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन विहिरीच्या अनुदानासाठी,फळबाग लागवड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शासनामार्फत एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.या ॲप्लिकेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
Magel Tyala Vihir Online Apply
•आपल्याला हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील Google Play Store वरती जावे लागेल.

•तिथे गेल्यानंतर MAHA EGS Horticulture/Well App असे सर्च करायचे आहे.

•या ॲप्लिकेशनची लिंक आम्ही खाली देत आहोत.

•हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इंस्टॉल करायचे आहे.

•आता हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर लाभार्थी लॉगिन आणि विभागाचे लॉगिन असे दोन पर्याय दिसतील.Magel Tyala Vihir Online Apply

•आपण अर्ज करण्यासाठी लाभार्थी लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.


•पुढे आपल्यासमोर बागायती लागवड अर्ज,विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती असे तीन पर्याय दिसतील.

•सिंचन विहिरीसाठी अर्ज करण्यासाठी विहीर अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आपल्या समोर अर्ज ओपन होईल तिथे आपण आपले संपूर्ण नाव,मोबाईल क्रमांक,जिल्हा,तालुका,ग्रामपंचायत आणि आपले गाव निवडायचे आहे.

•त्यांनतर आपल्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

•आता आपल्याला आपला मनरेगाचे जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे.

•त्यानंतर मनरेगा जॉब कार्डचा फोटो किंवा पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here