जामखेड महाविद्यालयातील खेळाडू शुभम हंबीरराव याची रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
890

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयातील खेळाडू शुभम हंबीरराव याची रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, जिद्द कठोर परिश्रम व खेळातील सातत्य या गुणांवर ,जामखेड महाविद्यालयातील खेळाडूं शुभम अरुण हंबीरराव याने पंजाब येथे झालेल्या SSPF National Games या स्पर्धेत 800 मीटर या क्रीडा प्रकारात सुवर्णं पदक मिळवले आहे.त्याची रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत निवड झाल्या बद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन जामखेडचे अध्यक्ष व उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशिद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख डॉ.केळकर, महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. आण्णा मोहिते, श्री किशोर सातपुते उपस्थित होते.


संस्थेचे अध्यक्ष मा. श्री उद्धव बापू देशमुख म्हणाले की, या खेळाडूंची कामगिरी म्हणजे महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे, महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी या खेळाडूने केलेल्या कामगिरीचे महाविद्यालयीन विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी मनापासून कौतुक केले.


संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख,सहसचिव मा. श्री. दिलीपशेठ गुगळे, खजिनदार मा.श्री. राजेशजी मोरे, मा.श्री. अशोकशेठ शिंगवी. मा.श्री. सैफुल्ला खान , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल.डोंगरे,कला विभागाचे प्रमुख प्रा.फलके महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सुधारणा कक्षचे समन्वयक प्रा गाडेकर तसेच उपप्राचार्य प्रा डॉ नरके यांनी या खेळाडूचे तसेच मार्गदर्शक डॉ. अण्णा औमोहिते यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.


याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम.एल. म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. या क्रीडा प्रकाराबरोबरच थाळीफेक गोळा फेक बॉल बॅडमिंटन स्पर्धा या इतर अनेक स्पर्धेमध्येही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पर्यंत नाव मिळवले आहे.


नजीकच्या काळात विद्यापीठाच्या वतीने विभागीय स्पर्धा आयोजित केलेले आहेत त्यामध्ये सुमारे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वीस महाविद्यालयाचे संघ सहभागी होणार आहेत. महाविद्यालयाच्या दृष्टीने दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कठोर मेहनत घेतात आणि अतिशय मनापासून सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात.

त्यांच्या या प्रयत्नाला महाविद्यालयाचा क्रीडा विभाग व त्यांचे मार्गदर्शक डॉ. मोहिते नेहमीच मदत करत असतात त्यामुळे या खेळाडूच्या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो. रशिया येथे होणाऱ्या आंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. डोंगरे एम एल यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here