शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्राथमिक नंतर माध्यमिक शिक्षणविभागावर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा मोर्चा एका माध्यमिक शाळेच्या भेटीत अनेक शिक्षक गैरहजर, काय कारवाई होणार?

0
784

जामखेड न्युज——

शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्राथमिक नंतर माध्यमिक शिक्षणविभागावर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा मोर्चा

एका माध्यमिक शाळेच्या भेटीत अनेक शिक्षक गैरहजर, काय कारवाई होणार?

 

जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म्हणून बाळासाहेब धनवे यांची पदभार स्वीकारल्यापासून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळा भेटी, काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक तर कामचुकार शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलला यामुळे कामचुकार शिक्षकांचे धाबे दणाणले असून सर्व शाळेच्या वेळेत शाळेत जाऊ लागले. प्राथमिक विभागानंतर आपला मोर्चा माध्यमिक विभागाकडे वळवला आहे.

आज गुरुवार दि. २३ रोजी अचानक जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगांव येथे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची अचानक भेट दिली असता अनेक कर्मचारी गैरहजर तर मुख्याध्यापक दररोजच उशिरा शाळेत येतात आता गैरहजर शिक्षकांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.


ग्रामस्थांच्या वारंवार येत असलेल्या तक्रारीवरून जिजामाता माध्यमिक विदयालय घोडेगांव ,ता . जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी सकाळीअचानक भेट दिली त्यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक उशिरा आले. तर काही शिक्षकेतर कर्मचारी तीन महिन्यापासून गैरहजर असल्याचे दिसून आल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचा बडगा उगारला यामुळे कामचुकार शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

माध्यमिक विभागाकडे चांगले लक्ष दिल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात चांगली खळबळ उडाली आहे .


याबाबत माहिती अशी की, घोडेगांव येथील माध्यमिक विद्यालयातील शाळा भेटीच्या वेळी या शाळेचे मुख्याध्यापक श्री. बोराटे एम्. ए .हे स्वतः उशिरा आले .शाळेतील लिपिक श्री. फाटके बी.एन . हे दि . १३ सप्टेंबर २३ पासून ते आज अखेर गैरहजर आहेत शिपाई श्री भोंडवे आर् . एस् . हे दि. १ नोव्हेंबर २३ पासून तर श्री. रासकर बी. के. प्रयोगशाळा परिचर हे शालेय कामी गैरहजर दिसून आले .

शाळेत एकूण दोन शिक्षक व पाच शिक्षकेतर कर्मचारी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी गैरहजर आढल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी कामचुकार शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलला या कारवाईचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here