जामखेड न्युज——
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा – सुधीर राळेभात
जवळा येथे श्री साईकिरण हाँस्पिटल व आयुर्वेदिक चिकित्सालयचे उद्घाटन संपन्न

रुग्णांना आरोग्य सेवा पुरवत असतांना डॉक्टरांनी रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा माणून आत्मीयतेने आपले कर्तव्य बजावत हा व्यवसाय यशस्वी केला पाहीजे.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी हाँस्पिटल उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

जवळा येथे डॉ. प्रांजल किरणकुमार जाधव यांच्या श्री साईकिरण हाँस्पिटल व आयुर्वेदिक चिकित्सालय चे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात, विद्यमान उपसभापती कैलास वराट, संचालक सतिश शिंदे, विठ्ठल चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड, सरपंच सुशिल आव्हाड, माजी सरपंच प्रशांत शिंदे, प्रदीप दळवी,सदस्य अशोक पठाडे, नय्युम शेख, दयानंद कथले, रामदास सरोदे, महादेव वराट, संगिता जाधव, खंडू जाधव, दिपा जाधव, दिलीप जाधव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुधीर राळेभात म्हणाले की,
आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या, असा सल्लाही दिला.

यावेळी प्रशांत शिंदे, सुशील आव्हाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सध्याच्या धावपळीच्या व फास्ट फूड च्या जमान्यात लोक अनेक गंभीर व्याधींनी त्रस्त आहेत.

यासाठी आयुर्वेदिक उपचार खूपच महत्त्वाचे आहेत आणि ते जवळा येथे श्री साईकिरण हाँस्पिटल व आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या रूपाने उपलब्ध झाले आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा





