जामखेड न्युज——
महायुतीच्या सरकारकडून आमदार प्रा. राम शिंदे यांनी आणली कर्जत जामखेड साठी खास भेट
कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला आणखीन एक मोठे यश मिळाले आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेडकरांना मोठे गिफ्ट दिले आहे.
मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरवणे या योजनेतून सुमारे पाच कोटींचा भरघोस निधी मंजुर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास कामांचा नवा झंझावात निर्माण झाल्याने जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांमधील स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडे ग्रामीण भागात मुलभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी केली होती. आमदार प्रा.राम शिंदे यांनी या मागण्यांची तातडीने दखल घेत नगरविकास व पंचायतराज विभागाकडे या कामांसाठी पाठपुरावा हाती घेतला होता.
सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत कर्जत-जामखेड मतदारसंघातील 51 कामांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. ही कामे 2023-2024 या आर्थिक वर्षांतील तरतुदींनुसार ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे (लेखाशिर्ष 2515 1238 ) या योजनेतून मंजुर करण्यात आली आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विविध विकास कामे मार्गी लावण्याचा धडाका हाती घेतला आहे. आजवर त्यांनी करोडो रूपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. आमदार प्रा राम शिंदे हे मंत्री असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा जो झंझावात निर्माण झाला होता तोच झंझावात आता महायुती सरकारच्या काळात सुरु झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळत असल्याने मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजुर होत आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुक्यातील मंजुर कामे व निधी खालीलप्रमाणे
1) घोडेगाव येथे सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
2) हळगाव येथील तुकाईवस्ती येथे बाळू मामा मंदिर सभामंडप बांधणे – 7 लाख रूपये
3) मतेवाडी येथे मतेगल्ली ते कल्याण रांगडे घरे सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करणे – 8 लाख रूपये
4) कवडगाव येथे नवीन स्मशानभूमी बांधणे – 10 लाख रूपये
5) महारूळी येथे सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
6) बाळगव्हाण येथील तुळजाभवानी मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
7) दिघोळ येथे संत नरहरी सोनार महाराज मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
8) पाडळी येथील जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत उभारणे – 10 लाख रूपये
9) फक्राबाद येथे कब्रस्थान वाॅल कंपाऊड बांधणे व सुशोभीकरण करणे – 10 लाख रूपये
10) पाटोदा बसस्थानक परिसरात पेविंग ब्लाॅक बसवणे – 10 लाख रूपये
11) बुऱ्हाणपुर येथील मारूती मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
12) मुंगेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा इमारत बांधणे – 10 लाख रूपये