जामखेड न्युज——
निवारा बालगृहातील अनाथ मुलांसोबत
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची दिवाळी
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी जामखेडचा पदभार स्वीकारल्यापासून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. शाळा भेटी, गुणवंत शिक्षकांचा सन्मान याचबरोबर कामचुकार शिक्षकांवर कारवाई यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे.
जामखेड न्युजशी बोलताना गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की, आज माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण व आनंदाची दिवाळी ! कारणही तसेच आहे .मा. आरुण जाधव व त्यांचे सर्व सहकारी अतिशय कष्टाने मेहनतीने मोहा , ता. जामखेड येथे चालवित असनेले निवारा बालगृह !. या बालगृहात ८५ अनाथ मुले राहतात. त्यांच्या सोबत आज दिवाळी साजरी केली.
या मुलांना स्वतः आरुण जाधव , त्यांच्या पत्नी , शाळेत कार्यरत शिक्षक कर्मचारी यांनी उटणे लावून अंघोळ घातली. व नवे कपडे घालून दिवाळी साजरी केली.
श्री. आरुण जाधव हे सामजिक व राजकीय क्षेत्रात फार मोठ्या पदावर काम करणारे व्यक्तिमत्व आहे . परंतु ते ज्या पध्दतीने स्वतः चे मुले समजून अंघोळ घालत होते ते पाहून मला त्यांचा खुप खुप अभिमान वाटला .!
उपस्थित अधिकारी वर्गाचा सत्कार केला . मी पण फुल न फुलाची पाकळी म्हणून ५००० रुपये ची मदत केली. आपणही अशीच मदत करून या अनाथ मुलांची दिवाळी गोड करावी ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिल्या आहेत.