जामखेड करांसाठी खुशखबर!!! सुरक्षिततेची काळजी मिटली आता शिवनेरी अकॅडमी पुरविणार सिक्युरिटी गार्ड

0
315

जामखेड न्युज——

जामखेड करांसाठी खुशखबर!!!

सुरक्षिततेची काळजी मिटली आता शिवनेरी अकॅडमी पुरविणार सिक्युरिटी गार्ड

सणासुदीच्या दिवसांत घर बंद असले की घरफोडी होते चोरी होते. घरातील महागामोलाचा दस्तऐवज मौल्यवान वस्तू, पैसा अडका चोरी होतो. सणासुदीच्या दिवसांत घर बंद करून गावाला जाणे, घराच्या संरक्षणाचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावतो तसेच दुकानदारांना गर्दीच्या वेळी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो या सर्व कटकटी पासून सुटका मिळवण्यासाठी जामखेड शहरातील शिवनेरी अकॅडमी मार्फत आपणास आवश्यकतेनुसार सुरक्षित आणि खात्रीशीर सिक्युरिटी गार्ड पुरवले जातील. अशी माहिती शिवनेरी अकॅडमीचे प्रमुख कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी दिली. यामुळे आता सुरक्षिततेची काळजी मिटली आहे. सिक्युरिटी गार्ड ठेवून आपण सुट्टी साठी बिनधास्त जाऊ शकता.


शिवनेरी अकॅडमी म्हणजे देशभक्त सैनिक घडविणारी संस्था यात भोरे मेजर यांच्या संकल्पनेतून सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी कमवा आणि शिका योजना राबविण्यात येत आहे. बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. आपली फिजिकल प्रॅक्टिस , क्लासेस करून सिक्युरिटी गार्ड ची ड्युटी करू शकता आत्तापर्यंत भरती झालेले विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस विद्यार्थी -15 विद्यार्थिनी- 13 व इतर सर्वच दलातील भरती झालेले बहादूर विद्यार्थी -152 असे सर्व मिळून 180 विद्यार्थी आत्तापर्यंत आपल्या शिवनेरी अकॅडमी मधून भरती झालेले आहेत त्याचबरोबर पुणे -मुंबई सारख्या ठिकाणी 15,000/- रू. ते 20,000/.रु. प्लेसमेंट जॉब करत आहेत. कमवा आणि शिका योजना राबविण्यात येत आहे.

आपणस आपल्या संस्था, कार्यक्रम आदिंसाठी सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्यास याव्यतिरिक्त कोणत्याही समारंभास मुले भोजन वाढन्यासाठी लागल्यास किवा कोणत्याही दुकानवर शॉपकीपर म्हणून आवश्यकता असल्यास आपण शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी येथे संपर्क साधावा. आपणास खात्रीशीर सेक्युरीटी गार्ड मिळतील. आवश्यकतेनुसार नुसार आपल्याला सिक्युरिटी गार्ड, मुले उपलब्ध करून दिले जातील. संपर्कासाठी कॅप्टन लक्ष्मण भोरे (सेवा निवृत्त)
मोबाईल नंबर : 9158006663, 9922563566 या नंबर संपर्क करावा.

जी मुले अकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत त्यांना रोजगार उपलब्ध देण्याबरोबरच जामखेडकरांना प्रशिक्षित व सुसज्ज असे कमांडो सेक्युरिटी गार्ड सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी फक्त सैनिकच तयार करत नाही तर एक आदर्श नागरिक बनविण्याचे कामही केले जाते. तसेच फिजिकल प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांसाठी कमवा व शिका योजना भोरे मेजर राबवित आहेत याचा फायदा ग्रामीण भागातील अनेक भरतीपर्व प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here