एवन टेक्सटाईलच्या रूपाने जामखेडच्या वैभवात पडणार भर भव्य – दिव्य अशा एवन टेक्सटाईलचा शुभारंभ विजयादशमी दिवशी

0
789

जामखेड न्युज——

एवन टेक्सटाईलच्या रूपाने जामखेडच्या वैभवात पडणार भर

भव्य – दिव्य अशा एवन टेक्सटाईलचा शुभारंभ विजयादशमी दिवशी

 

जामखेड शहराच्या वैभवात भर टाकणारे भव्य दिव्य एवन टेक्सटाईल मध्ये क्लाँलीटी, व्हरायटी, डिझाईन, फिटिंग सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होत आहे.

भव्य अशा एवन टेक्सटाईल चा शुभारंभ विजयादशमीच्या दिवशी अध्यात्मिक, राजकीय व सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या हस्ते होत आहे. तरी शुभारंभ सोहळ्यासाठी बोराटे व राऊत परिवाराने आपणास आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.

एवन टेक्सटाईलचा भव्य शुभारंभ सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तसेच खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार सुरेश धस, अखिल भारतीय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, प. पू. पांडुरंग शास्त्री देशमुख, हभप रामकृष्ण महाराज रंधवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.


वै.विठ्ठलराव आण्णा राऊत आणि आदरणीय श्री साधू नाना बोराटे यांचे संकल्पनेतून साकारत असलेल्या. एवन टेक्सटाईलच्या रूपाने जामखेड शहरात भव्य दिव्य वस्त्र दालन होत आहे. बोराटे व राऊत परिवाराने जामखेड शहरात पहिल्या संपूर्ण वातानुकूलित चार मजली भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केला आहे. यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.

नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि दर्जेदार वस्त्रसेवा पुरविण्यासाठी बोराटे व राऊत परिवाराने नवा प्रवास सुरू केला आहे. तरी विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वस्त्ररूपी सोने लुटा आणि आपल्या परिवारास नाविन्यपूर्ण वस्त्रांची भेट द्या असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here