जामखेड न्युज——
नगरसेवक बिभीषण धनवडे व जगदंबा महिला मंडळांनी घडवले शेकडो महिलांना मोहटादेवीचे दर्शन
जामखेड शहरातील जगदंबा माहिला मंडळ यांच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून नवरात्र उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेले नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे हे गेल्या ६ वर्षांपासून शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त मोहटादेवी दर्शन सोहळ्याचे आयोजन करतात. या वर्षी सुमारे २५० महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडविले.
दि १८ रोजी सकाळी ११.०० वाजता माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्या हस्ते नारळ फोडून मोहटादेवी दर्शन साठी गाड्या रवाना झाल्या यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, सोमनाथ पाचर्णे, संचालक रवींद्र हुलगुंडे,प्रविण चोरडिया,पोपट राळेभात, रमेश वराट दाजी, सोमनाथ राळेभात, ॲड प्रविण सानप, डॉ.अल्ताब शेख, अनिल यादव, गणेश शेठ डोंगरे, उध्दव हुलगुंडे, शिवकुमार डोंगरे, प्रविण बोलभट, विष्णू गंभीरे, विलास मोरे, शुभम धनवडे, शहाजी निमोणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहिला भाविकांना दर्शनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून घेऊन जातात. सालाबादप्रमाणे यावर्षी ही प्रभागातील माहिला तसेच भाविकांसाठी मोहटा देवीच्या दर्शनासाठी २० चार चाकी वाहनांची सोय केली होती. सुमारे २५० महिलांनी सहभाग नोंदवला.
प्रभाग क्रमांक १५ मधील माहिला तसेच भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणण्यासाठी नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष बिभिषण मामा धनवडे यांनी मोफत सेवा दिली. या मध्ये साधारण २५० महिलांनी मोहटादेवी दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच माहिला भाविकांना नऊ दिवस उपवास असल्याने दुपारी मोहटा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केली होती.