जामखेड न्युज ——
स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसीच्या रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी – संजय सस्ते
साकत सारख्या ग्रामीण व दुर्गम भागात संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट व सचिव कैलास वराट यांनी स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसीच्या रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून दिली या संधीचा ग्रामीण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बारामती अँग्रोचे वरिष्ठ अधिकारी संजय सस्ते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांच्या विविध प्रश्नांवर युवा संघर्ष यात्रा २४ ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर अशी आहे. या पाश्वभूमीवर परिसराची पाहणी करत असताना संजय सस्ते यांनी कै. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसीला भेट दिली काॅलेजची इमारत व परिसर पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बारामती अँग्रोचे वरिष्ठ अधिकारी संजय सस्ते, उपसभापती कैलास वराट, अनिल पवार, अनुप देशमुख, कर्जतचे नितीन धांडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, दादासाहेब ढवळे, महादेव वराट आदी मान्यवर उपस्थित होते.
वराट बंधूनी साकतसारख्या ग्रामीण व दुर्गम भागात संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून श्री साकेश्वर ज्युनियर काॅलेज तसेच जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक काॅलेज सुरू केले होते. या काॅलेजमधुन आजपर्यंत अनेक डॉक्टर, इंजिनिअर घडवले आहेत. या वर्षी पासून स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी सुरू केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.